क्राईमपुणे

शिकवणीसाठी आलेल्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार,शिक्षकी पेशाला काळीमा


पुणे : शिकवणीसाठी आलेल्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना पुरंदर तालुक्यातील निरा येथे घडली आहे.

पीडित मुलीच्या तक्रारीवरुन जेजुरी पोलिसांनी आरोपी सुनिल चव्हाण या शिक्षकाला ताब्यात घेतले आहे. आरोपीने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करुन शिक्षकी पेशाला काळीमा फासला आहे. (Pune Pimpri Chinchwad Crime News)

पुरंदर तालुक्यातील नीरा येथे ज्ञानदिप कोचिंग क्लासेसमध्ये (Dnyandeep Coaching Classes Narhe) आरोपी शिकवण्याचे काम करतो. त्याच्याविरोधात पीडित अल्पवयीन मुलीने जेजुरी पोलीस ठाण्यात (Jejuri Police Station) फिर्याद दिली आहे. त्याच्यावर बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (पोक्सो अॅक्ट) गुन्हा दाखल करुन आरोपीला ताब्यात घेतले आहे.

पीडित मुलगी आरोपी चव्हाण याच्याकडे खासगी शिकवणीसाठी जात होती.
त्याने सुरुवातीला मुलीला लग्नाचे आमिष दाखवले. आरोपीने मुलीला 1 मे 2023 रोजी दुपारी एक वाजता क्लासच्या आतील खोलीत घेऊन गेला. तु मला आवडतेस, माझे तुझ्यावर खुप प्रेम आहे, आपण लग्न करु असे म्हणून मुलीला जवळ ओढून घेत तिचा विनयभंग केला.

यानंतर आठ दिवसांनी क्लास संपल्यानंतर दुपारी एक नंतर आरोपी चव्हाण याने तिला कोचिंग क्लासेसच्या सर्व मुली
निघुन गेल्यानंतर थांबवून घेतले. तीला शिकवण्याच्या खोलीतून दुसऱ्या खोलीत नेऊन तिच्यावर अत्याचार करण्याचा
प्रयत्न केला. त्यावेळी तिने आरोपीला विरोध केला असता आरोपीने काहीही न ऐकता तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक
संबंध ठेवले. यानंतर आरोपी सुनील चव्हाण याने पीडित मुलीला नापास करण्याची धमकी देऊन शारीरिक संबंध ठेवले.
गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक मनोज नवसारे करीत आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button