क्राईम

प्रेमी युगुलाने पळून जाऊन केलं लग्न, १५ दिवसांनी घरी येताच दोन्ही कुटुंबात राडा


छत्रपती संभाजीनगरमधून एक भयंकर घटना समोर आली आहे. याठिकाणी पदमपुऱ्यातील मोची गल्ली शेजारी राहणाऱ्या मुला मुलीने पळून जाऊन लग्न केलं. पंधरा दिवस बाहेर राहून ते घरी आले.

यावेळी धक्कादायक प्रकार समोर आला. यावेळी दोन्ही कुटुंबातील १८ जण एकमेकांवर तुटून पडले.

यावेळी अनेकांची डोकी फुटली. यामध्ये काठ्याचाकू दांडे याने एकमेकांना बेदम मारहाण करण्यात आली. यामध्ये अनेकजण जखमी झाले आहेत. पोलीस याबाबत तपास करत आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, मोची गल्लीत राहणाऱ्या मेहरा आणि बरथूने कुटंबीय राहतात. या कुटुंबातील मुलगा आणि मुलीचे काही वर्षांपासून प्रेम संबंध होते. मात्र याला घरच्यांचा विरोध होता. यामुळे त्यांनी पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला.

दोघांनी आर्य समाज मंदिरात लग्न केल. तेव्हा ते 15 दिवस बाहेर राहिले. आता घरी सगळं काही नीट झाले असेल असे त्यांना वाटले. त्यानंतर दोन्ही कुटुंब एकमेकांवर तुटून पडले. यामध्ये दोन्ही कुटुंबांनी लाठ्या काठ्या आणि चाकूने एकमेकांवर वार केले.

यामुळे मोठी खळबळ उडाली. यामध्ये १८ ते २० जणांनी एकमेकांना बेदम मारहाण केली यामध्ये दहा जण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेनंतर पोलिसांनी या ठिकाणी जाऊन माहिती घेतली.

या दोघांच्या घरी वातावरण शांत असेल असे त्यांना वाटले पण याठिकाणी हत्याराने एकमेकांवर वार करण्यात आले. यामध्ये दहा ते बाराजण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

Video थंडीत बाईकवर तरुणीने उलटं बसून दिला Flying Kiss


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button