क्राईम

ठाण्यातील रेव्ह पार्टी उधळली! एमडी, चरस, गांजासह अंमली पदार्थांचा वापर, 100 जणांवर कारवाई


ठाणे : रेव्ह पार्टी ठाणे पोलिसांनी उघळून लावली आहे. ठाण्यातील रेव्ह पार्टीवर पोलिसांनी कारवाई केली आहे. या रेव्ह पार्टीत मद्यधुंद आणि नशेत धुंद असलेल्या तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. असं असताना नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडून नये, यासाठी ठिकठिकाणी पोलिसांची पथक तैनात करण्यात आली आहेत.



रेव्ह पार्टीवर ठाणे पोलिसांची धडक कारवाई

थर्टी फर्स्टनिमित्त ठाण्यात ठाणे गुन्हे शाखा पोलिसांची धडक कारवाई केली आहे. ठाण्यातील घोडबंदर कासारवडवली गावाच्या लगत रेव्ह पार्टीवर पोलिसांनी कारवाई केली आहे. रेव्ह पार्टीतील सुमारे 100 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. ठाणे गुन्हे शाखा उपयुक्त शिवराज पाटील, एसीपी, युनिट पाच आणि युनिट दोन यांच्याकडून संयुक्तरित्या कारवाई करण्यात आली आहे.

एमडी, चरस, गांजासह अंमली पदार्थांचा वापर

थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनसाठी मोठ्या प्रमाणात तरुणाई बेधुंद अवस्थेत पार्टीमध्ये सामील झाल्याचं दिसून आलं. एका खाजगी प्लॉटमध्ये ही रेव्ह पार्टी सुरू होती. या पार्टीमध्ये नशा करण्यासाठी विविध अंमली पदार्थांचा वापर होत असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. एमडी, चरस, गांजा, अल्कोहोल असे विविध अंमली पदार्थ या पार्टीमध्ये पुरवण्यात आले होते.

सुमारे 100 जणांवर कारवाई

ठाणे गुन्हे शाखा युनिट पाच आणि युनिट दोन यांनी केलेल्या संयुक्तरित्या कारवाई रेव्ह पार्टीत सुमारे 100 जणांना ताब्यात घेण्यात आलं असून त्यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आलं आहे. रेव्ह पार्टीत ताब्यात घेतलेल्या तरुणांना पोलिसांनी पंचनामा करून मेडिकलसाठी ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयात नेलं आहे.

हुप्पा हुय्या मराठी चित्रपट


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button