व्हिडिओ न्युज

Video पायलटने चुकीचा लीव्हर ओढला आणि विमान कोसळले; 72 जणांचा मृत्यू


पायलटने चुकीचा लीव्हर ओढला, त्यामुळे विमान कोसळले आणि 72 जणांना आपला जीव गमवावा लागला. अपघाताची चौकशी करणाऱ्या समितीने आपल्या प्राथमिक अहवालात हा खुलासा केला आहे.

फ्लाइट डेटा रेकॉर्डर (FDR) मधून अनेक खुलासे झाल्याचे अहवालात म्हटले आहे. रेकॉर्डिंगनुसार, सर्व इंजिन योग्यरित्या कार्य करत होते. एअर ट्रॅफिक कंट्रोलर (ATC) ने 10:57:07 वाजता विमानाला उतरवण्याची परवानगी दिली. पायलट फ्लाइंग (पीएफ) ने दोनदा सांगितले की, इंजिनमध्ये पॉवर नाही. अपघाताच्या वेळी दृश्यमानता सुमारे 6 किलोमीटर होती. आकाश जवळजवळ निरभ्र झाले होते. अशा परिस्थितीत, पायलटने चुकून कंडिशन लीव्हर ओढला असावा, ज्यामुळे इंजिन बंद झाले. अपघातस्थळी चौकशी केल्यानंतरही कंडिशन लीव्हर ओढल्याचे आढळून आले. त्यामुळेच हा अपघात झाला.

दरम्यान, इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशन (ICAO) नुसार, विमानातील वैमानिकांना कठोर प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण दिल्यानंतर चाचणी घेऊनच त्यांना परवाना दिला जातो. लोकांचे प्राण त्यांच्या हातात असतात, असे असूनही, पायलटने एवढी मोठी चूक कशी केली की त्याला योग्य लीव्हर ओळखता आला नाही? विमान उड्डाण करताना त्याची मानसिक स्थिती योग्य नव्हती की त्याने नकळत ही चूक केली? यासाठी कोणाला जबाबदार धरायचे? कॉकपिटमध्ये पायलटची एकाग्रता भंग झाल्याचेही तपासात समोर आले आहे. असे दिसते की, त्याने सह-पायलटच्या वारंवार कॉलकडे दुर्लक्ष केले. पायलटचे हे पहिलेच उड्डाण होते आणि त्याच्या एका चुकीमुळे हा अपघात झाला आणि 72 जणांना आपला जीव गमवावा लागला. अंतिम तपास अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.

Nepal Plane Crash Video Photos: नेपाळमध्ये कोसळलेल्या विमानाचा थरारक व्हिडिओ आणि फोटो आले समोर

ना इंजिनमध्ये बिघाड आढळला, ना अन्य तांत्रिक बिघाड आढळून आला

अपघातापूर्वी इंजिनमध्ये बिघाड झाल्याचे कोणतेही पुरावे मिळाले नसल्याचे अहवालात म्हटले आहे. अपघाताच्या वेळी दोन्ही इंजिन निष्क्रीय झाले होते. त्यामुळे इंजिनमध्ये बिघाड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. इतर कोणत्याही तांत्रिक यंत्रणेत बिघाड झाल्याचा पुरावा सापडला नाही. जेव्हा विमान पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळापासून 6500 फूट उंचीवर 15 मैलांवर होते, तेव्हा पायलटला रनवे 30 वर उतरण्यास सांगण्यात आले, परंतु पायलटने एटीसीला विनंती केली आणि रनवे 12 वर उतरण्यासाठी मंजुरी मिळाली. 10:51:36 वाजता विमान 6500 फूट खाली उतरले. 10:56:12 वाजता पायलटने 721 फूट उंचीवर ऑटोपायलट प्रणाली बंद केली. FDR ने त्यावेळी कोणत्याही फ्लॅप हालचालीची नोंद केली नाही. दोन्ही इंजिनांचा प्रोपेलर रोटेशन स्पीड (NP) एकाच वेळी 25 टक्क्यांहून कमी झाला आणि टॉर्क 0 टक्क्यांपर्यंत कमी झाला, परिणामी विमान कोसळले.

देवेंद्र फडणवीसांना एक मेसेज अन् नेपाळमध्ये अडकलेले ५८ भाविक महाराष्ट्रात सुखरूप परतले


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button