क्राईम

अंदाधुंद गोळीबार,दिवसाढवळ्या मुंबईत 16 राऊंड फायर, 1 ठार, 5 जखमी


मुंबई : शहरातील चुनाभट्टी परिसरात (24 डिसेंबर) दुपारी हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून सुमारे पाच जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत असून एकाचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील सायन-चुनाभट्टी परिसरात चुनाभट्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील व्हीएन पुरव मार्गावर असलेल्या आझाद गलीमध्ये गोळीबाराची घटना घडली. ही घटना आज दुपारी 3.15 च्या सुमारास गजबजलेल्या वस्ती परिसरात घडली. या गोळीबारात एकूण पाच जण जखमी झाले असून स्थानिक गुन्हेगार पप्पू येरुणकर याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

प्राथमिक माहितीनुसार, हल्लेखोरांनी 16 राउंड गोळीबार केला. गोळीबारानंतर आरोपी फरार झाले आहेत. जखमींना तातडीने सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेनंतर पोलिसांनी परिसरात चोख बंदोबस्त ठेवला आहे. मात्र भरदिवसा गोळीबाराच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांचे पथक घटनास्थळी हजर असून तपास करत आहे.

सुमित येरुणकर ऊर्फ पप्पू येरुणकर हा मुख्य टार्गेट होता. येरुणकरचा यापूर्वी काही गुन्हेगारी खटल्यांमध्ये सहभाग असून काही काळापूर्वी त्याची तुरुंगातून सुटका करण्यात आली होती. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच चुनाभट्टी पोलीस व वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मुंबई गुन्हे शाखाही या प्रकरणाचा तपास करत असल्याचे सूत्रांनी सांगितले. परस्पर वैमनस्यातून हे प्रकरण असल्याचा पोलिसांना संशय आहे, मात्र विविध बाजूंनी तपास सुरू आहे. मृत आणि इतर पाच जणांवर गोळीबार करणारे दोन संशयित होते, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. आरोपींची ओळख पटली असून 9 वेगवेगळी पथके आरोपींचा शोध घेत आहेत.

‘साहेब, माझा नवरा नपुंसक आहे…’, नवविवाहितेने गाठले पोलिस स्टेशन

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button