जनरल नॉलेज

स्मार्टफोनची गरजच नाही,जबरदस्त डिव्हाइस ! तुमचा हातच तुमचा मोबाईल


बाजारात किती तरी कंपन्यांचे किती तरी प्रकारचे स्मार्टफोन आले आहेत. यात नवनवीन व्हर्जन्सही येत आहेत. पण आता कदाचित सर्वांच्या हातातून स्मार्टफोन गायब होणार आहेत.

कारण आता हातच स्मार्टफोन होणार आहे. जगातील पहिली अशी जबरदस्त टेक्नॉलॉजी. अनोखं असं डिव्हाईस एआय पिन लाँच झालं आहे आणि पुढच्या वर्षीच ते बाजारात उपलब्ध होणार आहे.

जगातील पहिलं अनोखं असं उपकरण जे स्मार्टफोनसारखं काम करतं. पण त्याला स्क्रीन आहे, ना डिस्प्ले. पण या छोट्या उपकरणात शक्तिशाली कॅमेरे आणि सेन्सर आहेत. अवघ्या काही ग्रॅम वजनाच्या या उपकरणामुळे तुम्ही केवळ कॉलच करू शकणार नाही, तर तुमच्या स्मार्टफोनप्रमाणेच एसएमएस, व्हिडिओ कॉलिंग आणि फोटो किंवा व्हिडिओही काढू आणि पाहू शकता. तुमच्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यापर्यंत सर्व काही करेल, कारण ते ChatGPT सारख्या शक्तिशाली व्हर्च्युअल असिस्टंटने देखील सुसज्ज आहे.

आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) ने सुसज्ज असलेले हे छोटे उपकरण एका पिनसारखे दिसतं. पिनच्या वर एक कॅमेरा आणि सेन्सर आहे, जो तुमच्या हातावर व्हिज्युअल प्रोजेक्ट करतो आणि तुमचा तळहात मोबाईल स्क्रीनप्रमाणे काम करू लागतो. तुम्ही ते टेबलवर, भिंतीवर किंवा कोणत्याही पृष्ठभागावर प्रोजेक्ट करू शकता आणि ते अगदी स्क्रीनप्रमाणे पाहू शकता. हे डिव्हाइस तुम्ही तुमच्या शरीरावर कुठेही लावू शकता, कपड्यांवर टॅग करू शकता.

 

हा अप्रतिम एआय पिन भारतीय वंशाचा ब्रिटिश नागरिक असलेला सॉफ्टवेअर इंजिनीअर इम्रान चौधरीने तयार केला आहे. 2017 पर्यंत इम्रान अॅपलच्या डिझाइन टीमचा प्रमुख भाग होता. आयफोन, आयमॅक, आयपॅड आणि अॅपल टीव्हीच्या डिझाइनमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. 2018 साली त्यानं Apple सोडलं आणि Humane नावाचा स्टार्टअप सुरू केला. OpenAI चे CEO सॅम ऑल्टमन यांचा या स्टार्टअपमध्ये 15 टक्के हिस्सा आहे. याशिवाय सेल्सफोर्सचे सीईओ मार्क बेनिऑफ, मायक्रोसॉफ्ट, एलजी, व्होल्वो आणि क्वालकॉम या आघाडीच्या कंपन्यांनीही गुंतवणूक केली आहे.

इम्रान या एआय पिनवर सुमारे 4 वर्षे काम करत होता, परंतु हा संपूर्ण प्रकल्प इतका गुप्त होता की कोणालाही सुगावाही लागला नाही. शेवटी तो स्वतः पुढे आला आणि त्याची खासियत सांगितली. भारतीय वंशाच्या सॉफ्टवेअर अभियंत्याने तयार केलेलं हे उपकरण जे मोबाइलचे भविष्य ठरणार आहे.

 

आत्तापर्यंत त्याचे फीचर्स ऐकल्यानंतर तुम्हाला वाटेल की हे खूप महाग असेल तर तसं अजिबात नाही. अमेरिकन बाजारात विकल्या जाणार्‍या एआय पिनची किंमत आयफोनपेक्षा कमी आहे. याची किंमत 699 अमेरिकन डॉलर्स म्हणजे सुमारे 57,318 रुपये ठेवण्यात आली आहे. याशिवाय तुम्हाला ह्युमनचे मासिक सबस्क्रिप्शनही घ्यावे लागेल. त्याची किंमत 24 डॉलर असेल. म्हणजे या डिव्हाइसला दरमहा 24 डॉलर म्हणजे सुमारे 1,968 रुपयांचा रिचार्ज करावा लागेल. यामध्ये तुम्हाला मोबाईल नंबर आणि डेटा देखील मिळेल.

नागपूर बहिणीला त्रास दिला,जावयाला लाकडी दांड्याने मारहाण करून त्याचा हात फ्रॅक्चर,भावांविरुद्ध गुन्हा दाखल


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button