Manoj Jarange Patilमराठा आरक्षण

मराठा समाजासाठी हायकोर्टातून मोठी बातमी..


राज्य लोकसेवा आयोगाच्या भरती प्रक्रीयेत SEBC अर्थात सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या मागासवर्गासाठीच्या आरक्षणाचा लाभ घेऊन अर्ज करणाऱ…



मराठा समाजासाठी सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या मागास वर्गाचं आरक्षण उपलब्ध झाल्यानंतर २०१९ मधे अनेक मराठा उमेदवारांनी त्या प्रवर्गातून अर्ज केले होते. मात्र नंतर हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयात रद्दबातल ठरलं.

तेव्हा या उमेदवारांना आर्थिक दृष्ट्या दुर्बल गटासाठीच्या प्रवर्गातून अर्ज करण्याची मुभा तत्कालिन राज्य सरकारनं दिली होती.या निर्णयाला महाराष्ट्र प्रशासकीय न्यायधिकरणाने स्थगिती दिली.त्यानंतर या उमेदवारांच्या नियुक्त्या रखडल्या.

न्यायधिकरणाच्या निर्णयाला काही उमेदवारांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं.न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या पीठाने आज ही स्थगिती उठवली. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गासाठीच्या आरक्षणाचा लाभ घेण्याचा मार्ग मराठा उमेदवारांसाठी मोकळा झाला आहे.

या निर्णयामुळे मराठा समाजातल्या ३ हजार ४८५ उमेदवारांचा नोकरीचा मार्ग मोकळा झाला असून या उमेदवारांना EWS मधून नियुक्त्या दिल्या जाणार असल्याचं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

आई बनली राक्षस,’अवैध संबंध’मुळे,महिलेने 15 महिन्यांच्या मुलाला जलाशयात फेकले…


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button