Manoj Jarange Patilबीडमराठा आरक्षण

मनोज जरांगे यांच्या बीडच्या रॅलीची जय्यत तयारी,तीन टन खिचडी, ट्रकभर केळी


बीड : मैदानावर मनोज जरांगे पाटील(Manoj Jarange) यांची सभा होणार आहे. याच पार्श्वभूमीवर विशेष पोलीस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सभास्थळी आढावा घेतला आहे.



सभेच्या अनुषंगाने पोलीस प्रशासन आणि मराठा समन्वयकांमध्ये चांगला समन्वय आहे. ज्या बाबी महत्त्वाच्या वाटल्या त्यावर चर्चा झालीय. सभेसाठी येणाऱ्या आणि महामार्गावरील प्रवाशांना कुठलीही अडचण निर्माण होऊ नये या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. वाहतुकीत बदल देखील करण्यात आलेला आहे. सभेच्या दिवशी या मार्गावर जड वाहतूक बंद केली जाईल केवळ अत्यावश्यक वाहनांनाच महामार्गावरून मार्ग मिळणार आहे. तर उपद्रवी लोकांवर लक्ष असल्याचे देखील विशेष पोलीस महानिरीक्षकांनी सांगितले.

तीन टन खिचडी, ट्रकभर केळी अन् चार लाख पाण्याच्या बाटल्या अशी आहे सभेची तयारी

उद्या बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांची इशारा सभा आहे. याच सभेची जय्यत तयारी सुरू झाली आहे. उद्या मोठ्या संख्येने मराठा बांधव एकत्रित येणार आहेत. त्यामुळे आयोजकांनी मोठी तयारी केली आहे. उद्या येणाऱ्या मराठा बांधवांसाठी तब्बल तीन टन खिचडी करण्यात येणार आहे. तर चार लाख पाणी बॉटल्स आणि एक ट्रक केळी वाटप करण्यात येणार आहे

उद्या होणारी सभा ऐतिहासिक होणार आहे. अगदी शांततेत ही सभा पार पडणार असल्याचा विश्वास समन्वयकांनी व्यक्त केला आहे.

 

मनोज जरांगेंच्या सभेपूर्वी बीडमधील 125 मराठा आंदोलकांना पोलिसांची नोटीस


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button