ताज्या बातम्या

रुग्णालयांमध्ये जागा मिळणार नाही; कोरोनाच्या JN.1 व्हेरिएंटबाबत गंभीर इशारा


कोरोना व्हायरसच्या JN.1 या नव्या व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. जगभरात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. भारतात देखील नव्या व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

अमेरिकेतही नव्या व्हेरिएंटचा प्रसार वेगाने होत आहे.

अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) ने या नव्या व्हायरसच्या प्रसाराचा वेग आणि त्याच्याशी संबंधित धोक्यांसंबंधी गंभीर इशाला दिला आहे. JN.1 कोरोना व्हायरसचा एक अत्यंत संसर्गजन्य प्रकार आहे. त्याचा वेगाने होणारा प्रसार यामुळे रुग्णालयात रुग्णांना मोठ्या संख्ये अॅडमिट करावं लागू शकते.

सीडीसीने सांगितले की, कोविड रूग्णांच्या हॉस्पिटलायझेशनची संख्या वेगाने वाढत आहे. प्रशासन या परिस्थितीवर देखील लक्ष ठेवून आहे. सीडीसीला भीती आहे की आगामी काळात परिस्थिती कठीण होऊ शकते.

सीडीसीच्या म्हणण्यानुसार, देशाच्या काही भागात मुलांची रुग्णालये दाखल होण्याची संख्या वाढली आहे. मागील आठवड्यापेक्षा रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या जवळपास दुप्पट होती. यासोबतच वृद्ध नागरिकांमध्येही कोरोना व्हायरसचे प्रमाण फ्लूपेक्षा जास्त आहे. त्यामुळे आरोग्य अधिकाऱ्यांची चिंता वाढली आहे.

सीडीसीचा अंदाज आहे की JN.1 रुग्णांच्या संख्येतील वाढ सुरूच राहील. कोरोनाचा नवा व्हेरिएंट JN.1 कोविड-19च्‍या नवीन लाटेचे कारण ठरु शकते. हा व्हेरिएंट BA.2.86 व्हेरियंट सारखाच मानला जात आहे.

 

दारूच्या नशेत मोबाईल हॅण्डसेट घेण्‍याच्या वादातून,सोडा वॉटरच्या बाटल्या डोक्यात मारून मित्राचा खून

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button