ताज्या बातम्या

भाजप 2024 ला स्वबळावर लढणार?; कुणी केला दावा?


भाजप आणि आरएसएसमध्ये बैठक झाल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. तसंच या बैठकीत भाजपची रणनिती ठरल्याचंही आव्हाड म्हणालेत.

2024 ला महाराष्ट्रात भाजप एकटीच लढेल. ज्यांना भाजपसोबत निवडणूक लढवायची असेल त्यांना कमळावर निवडणूक लढवावी लागेल, असं आव्हाडांनी म्हटलंय. जितेंद्र आव्हाड यांच्या ट्विटने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.

जितेंद्र आव्हाड यांचं ट्विट जसंच्या तसं

नागपूरमधील हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर धक्कादायक राजकीय चर्चा सुरू झाली आहे.
नागपूरमध्ये भाजप -आरएसएस यांची एक वैचारिक बैठक झाली. त्यामध्ये तीन राज्यातील निवडणुका जिंकल्यानंतर महाराष्ट्रात काय असू शकते, यावर मंथन झाले. या मंथनातून राज्यात भाजपने एकट्याने निवडणूक लढवावी, असे ठरवण्यात आले. ज्यांच्यावर आरोप आहेत; ज्यांच्यावर डाग आहेत. त्यांना सोबत घेऊ नये, असे ठरविण्यात आले. ज्यांना राजकारण समजते; ज्यांना राजकीय जाण आहे. त्यांना लगेच समजले असेल की, महाराष्ट्रात भाजप एकटीच लढेल. ज्यांना भाजपसोबत निवडणूक लढवायची आहे, त्यांनी कमळावर निवडणूक लढवावी.महाराष्ट्रात पुढे काय होईल, हे सांगता येत नाही.

नागपूरमधील हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर धक्कादायक राजकीय चर्चा सुरू झाली आहे.
नागपूरमध्ये भाजप -आरएसएस यांची एक वैचारिक बैठक झाली. त्यामध्ये तीन राज्यातील निवडणुका जिंकल्यानंतर महाराष्ट्रात काय असू शकते, यावर मंथन झाले. या मंथनातून राज्यात भाजपने एकट्याने निवडणूक लढवावी, असे…

— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 20, 2023

 

https://www.navgannews.in/crime/36763/


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button