Manoj Jarange Patilमराठा आरक्षण

मुलाच्या मृत्यूनंतर 70 वर्षांच्या सासऱ्याने 28 वर्षांच्या सुनेसोबत लग्न का केले?


मुलाच्या मृत्यूनंतर 70 वर्षांच्या सासऱ्याने 28 वर्षांच्या सुनेसोबत लग्न केले आहे. सुनेपेक्षा सासरा 42 वर्षांनी मोठा आहे. सासरा व सुनेने एकत्रित मिळून हे पाऊल उचलल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.

मात्र, या लग्नाबाबत कोणीच पोलिसांत तक्रार दिलेली नाही. परस्परसंमतीने हे लग्न झाले असले तरी या अनोख्या लग्नाची परिसरात चर्चा झाली.

गोरखपूरमधील एका गावात वयाच्या 70व्या वर्षी सासरा आपल्या 28 वर्षांच्या सुनेच्या प्रेमात पडला. त्याने कुटुंबाची आणि समाजाची पर्वा न करता सुनेशी मंदिरात जाऊन लग्न केले. सासऱ्याने आपल्यापेक्षा 42 वर्षांनी लहान असलेल्या सुनेशी लग्न केल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

सुनेशी लग्न करणाऱ्या सासऱ्याचे नाव कैलाश यादव (वय ७०) आहे. कैलाश यादव हे बडहलगंज पोलीस स्टेशनचे चौकीदार आहेत. त्यांच्या पत्नीचे 12 वर्षांपूर्वी निधन झाले होते. छपिया उमराव गावातले रहिवासी असलेले कैलाश यादव यांच्या चार मुलांपैकी तिसर्‍या मुलाचा मृत्यू झाला. त्याची पत्नी विधवा झाली. त्यानंतर तिचे दुसऱ्या व्यक्तीशी लग्न लावून देण्याबद्दल चर्चा होत होती. याच दरम्यान, सासरे कैलाश यादव आपल्या सुनेच्या प्रेमात पडले. यानंतर कुटुंब आणि समाजाची पर्वा न करता त्यांनी सुनेसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. सुनेनेही प्रस्ताव मान्य केला आणि दोघांनीही एका मंदिरात लग्नगाठ बांधली. दोघांनीही संमतीने लग्न केले आहे. दोघांच्या या कृतीने परिसरात सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button