देश-विदेश

“घोटाळा झाला”; सबसे कातील गौतमी पाटीलच्या नव्या गाण्याची सोशल मीडियावर चर्चा


नृत्यांगणा गौतमी पाटील (Gautami Patil) ही तिच्या अदा आणि तिचा नृत्यानी प्रेक्षकांना घायाळ करते. गौतमी विविध कार्यक्रमांमध्ये डान्स करते. तसेच ती गाण्यांमध्ये देखील डान्स करते.

गौतमीची वेगवेगळी गाणी प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. काही दिवसांपूर्वी तिचं दिलाचं पाखरू हे गाणं रिलीज झालं होतं. आता तिचं घोटाळा झाला हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्यातील गौतमीच्या नृत्यशैलीनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. तसेच गाण्यातील गौतमीच्या अदा प्रेक्षकांचे लक्ष वेधत आहेत.

गौतमीचं ‘घोटाळा झाला’ गाणं झालं व्हायरल

गौतमीचं घोटाळा झाला हे गाणं Being Filmy Creations या युट्यूब चॅनलवर शेअर करण्यात आलं आहे. या गाण्याला आतापर्यंत 54,149 व्ह्यूज मिळाले आहेत. हे गाणे वैष्णवी आदोडेनं गायलं आहे. संकेत मेस्त्री हे या गाण्याचे गीतकार आहेत. घोटाळा या गाण्याला युट्यूबवर आतापर्यंत 4.2k लाईक्स मिळाले आहेत. गाण्यात गौतमी ही काळ्या रंगाची साडी, गोल्डन ज्वेलरी आणि मोकळे केस अशा लूकमध्ये दिसत आहे. घोटाळा हे गाणं सोशल मीडियावर व्हायरल झालं असून या गाण्यावर अनेक नेटकरी रिल्स तयार करत आहेत. अतुल भालचंद्र जोशी आणि सिद्धेश कुलकर्णी यांनी या गाण्याला संगीत दिलं आहे.

गौतमीच्या माझा कारभार सोपा नसतोय रं,दिलाचं पाखरू, सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम,पाटलांचा बैलगाडा या गाण्यांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. गौतमी तिच्या गाण्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिला इन्स्टाग्रामवर 1.4 मिलियन फॉलोवर्स आहेत. गौतमीच्या सोशल मीडियावरील पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळत असते. तिच्या पोस्टवर नेटकरी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतात.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button