क्राईम

जावयाचा जीव सासूवर, अंधारात आला भेटायला अन बायकोनं चांगलाच..


जावयाचा जीव सासूवर आला तर करायचं काय? त्यात जावई तीन मुलांचा बाप असेल, तर मग त्याची धुलाई पक्की आहे, यात काही शंकाच नाही.



अशीच एका अजब प्रेमाची गजब कहाणी समोर आली आणि व्हायचं तेच झालं.

जावई म्हणजे अगदी आदराचे पाहुणे असतात. ग्रामीण भागात तर कुटुंबीय जावयाला मान देतातच परंतु गावकरीही त्यांचा सन्मान करतात. आपल्या लेकीला त्यांनी सुखात ठेवावं एवढीच काय ती अपेक्षा असते. परंतु बिहारच्या जमुई जिल्ह्यात आलेल्या एका जावयाला मात्र गावकऱ्यांनी चक्क झाडाला बांधलं आणि तातडीने त्याच्या बायकोला बोलवून घेतलं. त्याचं झालं असं की, हा जावई त्याच्या गर्लफ्रेंडला भेटायला लपूनछपून या गावात आला होता.

गर्लफ्रेंड तरी कोण, तर त्याचीच मामेसासू. म्हणजेच त्याच्या बायकोची मामी. बरं त्याचं लग्न नुकतंच जुळलं होतं किंवा लग्नाला काहीच महिने झाले होते असं नाही. तर, त्याला तीन मुलं आहेत. परंतु त्याचा जीव सासूवर कधी आला याबाबत कोणाला काही माहिती नाही. परंतु दोघांच्या प्रेमाला अफाट उधाण आलं होतं.

दोघं रात्रीच्या अंधारात एकमेकांना भेटायचे. याबाबत गावकऱ्यांना भनक लागली आणि आता हा आला की याला पकडायचं असं त्यांनी ठरवलं. दोघांना काही एकमेकांवाचून राहवेना. शेवटी तो आपल्या सासू गर्लफ्रेंडला भेटायला आलाच. मग गावकऱ्यांनी त्याला पकडून झाडाला लटकवलं. तो खाली येऊच शकणार नाही, असं बांधूनच ठेवलं. त्याच्या बायकोला बोलवल्यानंतर तिला आधी धक्का बसला. मात्र तिचाही पारा चढला होता. तिने सरळ नवऱ्याला फटकवायला सुरुवात केली. चप्पलांचाही मार दिला. नवरा आता सासू काय कोणत्याच मुलीकडे बघणारसुद्धा नाही असा चोप तिने दिला. दरम्यान, याबाबत जिल्हाभर चर्चा आहे. परंतु प्रकरण पोलीस स्थानकापर्यंत पोहोचलं की नाही, याबाबत माहिती अद्याप समोर आलेली नाही.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button