क्राईम

पत्नीने आपल्या मुलीच्या दोन मित्रांच्या मदतीने आपल्या पतीला ज्वलनशील पदार्थ टाकून जाळण्याच्या का केला कट ?


कल्याणपूर्वेतील विजयनगर परिसरात एका घराला आग लागली. पोलीस आणि अग्निशमन कर्मचारी आग विझवण्यासाठी दाखल झाले. घराची आग विझवण्यात आली. मात्र आग विझवल्यानंतर अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे.



पत्नीने आपल्या मुलीच्या दोन मित्रांच्या मदतीने आपल्या पतीला ज्वलनशील पदार्थ टाकून जाळण्याच्या प्रयत्न केला. त्यामुळे घरात आग लागली. यात पती हरिश्चंद्र पवार गंभीर जखमा झाले होते त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान पतीच्या हत्येप्रकरणी कोळशेवाडी पोलिसांनी पत्नी अश्विनी पवार या महिलेला अटक केली आहे. अश्विनी पवार कल्याण पूर्व येथील एका शाळेत मुख्याध्यापिका आहे. या प्रकरणात अश्विनी पवार हिला साथ देणाऱ्या दोन तरुणांच्या पोलीस शोध घेत आहे. हरिश्चंद्र पवार यांना जाळण्यासाठी नक्की कोणत्या पदार्थाच्या वापर केला आहे याच्या देखील तपास पोलीस करीत आहे.

कल्याण पूर्व विजयनगर परिसरातील विशालनगरी कॉम्प्लेक्समध्ये हरिश्चंद्र पवार हे आपली पत्नी अश्विनी पवार व दोन मुलींसह राहत होते. हरिश्चंद्र पवार खासगी सुरक्षारक्षक होते. काही महिन्यांपूर्वीच ते रिटायर्ड झाले होते. तर त्यांची पत्नी अश्विनी ही कल्याणमधील एका शाळेत मुख्याध्यापिका आहे. त्यांच्या मोठ्या मुलीचे लग्न झाले तर लहान मुलगी ही घरीच असते. हरिश्चंद्र व त्यांचे पत्नी अश्विनी यांच्यात नेहमी वाद सुरू होते . शुक्रवारी रात्री देखील या दोघांमध्ये वाद झाले यावेळी हरिश्चंद्र यांच्या मुलीचे दोन मित्र देखील घरात होते.

संतापाच्या भरात अश्विनी यांनी हरिश्चंद्र यांच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला आणि क्षणार्धत हरिश्चंद्र पवार हे भाजले. याच दरम्यान त्यांच्या घराला देखील आग लागली. हरिश्चंद्र पवार गंभीररित्या भाजले असताना त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आज सकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला . याप्रकरणी कोळशेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करत अश्विनी पवार या महिलेला अटक केली तर दोन तरुण पसार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत, अशी माहिती कोळशेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी सुनील गवळी यांनी दिली.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button