क्राईम

बहिण-भावाचे अनैतिक संबंध, नग्नावस्थेत सापडले मृतदेह, प्रकरण काय?


इंदौरमधील अशोक नगरमधील एका फ्लॅटमध्ये शनिवारी रात्री झालेल्या दुहेरी हत्याकांडामुळे खळबळ उडाली आहे. या दुहेरी हत्याकांडाची माहिती मृताच्या मुलीनेच पोलिसांना दिली आहे.

माहिती पोलिसांना समजली तेव्हा एका खोलीत पुरुष आणि महिलेचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह सापडला होता. दोघांचाही गळा चिरुन हत्या (Murder) केल्याचे पोलिसांनी सांगितले. गळा चिरला असला तरीही दोघांच्याही शरीरावर चाकूचे वार झालेले होते. तर या दोघांची हत्या ही तलवारीने केली असून ती तलवारही वाकली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हत्याकांडामध्ये दोघांपेक्षा अधिक लोकांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. कारण ज्या खोलीत दोघांचे मृतदेह सापडले आहेत. त्या खोलीमध्ये तलवारीचे आणि चाकूचे वार झाले आहेत. त्याच्या खाणाखुणा भिंतीवरही उमटल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

पोलिसांनी हत्येचं कारण सांगताना ही हत्या अनैतिक संबंधातून झाल्याचे सांगितले. रवी जेव्हा जेव्हा अशोक नगरमध्ये सरिताला भेटायला येत होता. त्यावेळी आजूबाजूच्या लोकांना तो स्वतःला सरिताचा भाऊ असल्याचे सांगत होता. शनिवारी दोघंही फ्लॅटवर भेटत असताना त्यांच्यावर चाकू आणि तलवारीने हल्ला करून त्यांची हत्या केल्याचे उघड झाले आहे.

पोलीस उपअधीक्षक आदित्य मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री अशोक नगरमधील एका घराच्या तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये पुरुष आणि महिलेचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तपासात या दोघांची माहिती काढली असता रवी ठाकूर आणि सरिता ठाकूर अशी त्यांची नावं असल्याचे सांगण्यात आले. हत्येवेळी दोघांच्या अंगावर एकही कपडा नव्हता आणि त्याच अवस्थेत त्या दोघांवरही धारदार शस्त्रांनी वार करण्यात आले होते.यामध्ये ठार झालेला रवी सरवटे हा लॉज चालवत होता, तर सरिता अशोक नगरमध्ये ब्युटी पार्लर चालवत होती.

हत्याकांडाची माहिती मृत महिला सरिताच्या मुलीने पोलिसांना दिली. तिची मुलगी बाहेरून ज्यावेळी घरी परतली तेव्हा या दोघांचेही मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात सापडल्याचे तिला दिसल्याचे पोलिसांना सांगितले. ही हत्या झाली त्यावेळी सरिताचा पती ऋषीही घरी नव्हता.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button