ताज्या बातम्या

एमएसईबीमध्ये बंपर भरती, अर्ज करण्याची शेवटची तारीख, आजच करा अर्ज


मुंबई : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लिमिटेडकडून मोठी भरती प्रक्रिया ही राबवली जातंय. विशेष म्हणजे विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनीकडून याबद्दलची अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आलीये.



विशेष म्हणजे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही जवळ आलीये. उशीर न करता लगेचच उमेदवारांनी याकरिता अर्ज दाखल करावा. ही भरती प्रक्रिया तब्बल 2541 पदांसाठी पार पडत आहे. ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. उशीर न करता आजच उमेदवारांनी आपले अर्ज हे दाखल करावेत.

या भरती प्रक्रियेसाठी आपण फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. mahatransco.in. या वेबसाईटवर तुम्हाला या भरती प्रक्रियेसंदर्भातील सर्व माहिती मिळेल. तसेच तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज देखील mahatransco.in. या साईटवर जाऊनच करावा लागणार आहे. उशीर न करता आजच उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करावा.

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त बोर्डाचे किंवा विद्यापाठीतून संबंधित पदवी किंवा डिप्लोमा असणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे काही पदांसाठी दहावी पास उमेदवार देखील अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ठेवण्यात आलीये. 18 ते 28 पर्यंत वय असलेले उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 10 डिसेंबर 2023 आहे. उमेदवाराने अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी आता अवघे दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत. ही मोठी संधीच आहे. विशेष म्हणजे ही मेगा भरतीच म्हणावी लागणार आहे. चला तर मग लवकर करा या भरती प्रक्रियेसाठी अर्ज.

भरती प्रक्रियेत उमेदवाराची निवड ही परीक्षा आणि मुलाखतीमधून केली जाईल. अगोदर परीक्षा या उमेदवारांच्या घेतल्या जातील. त्यानंतर मुलाखती पार पडणार आहेत. इतके नाही तर उमेदवाराचे मेडिकल देखील होणार आहे. या सर्व गोष्टींनंतर उमेदवाराची निवड ही केली जाईल. परत एकदा लक्षात ठेवा अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 10 डिसेंबर 2023 आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button