ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाला मोठे यश


मुंबई: राज्यातील अंगणवाडी सेविकांनी आपल्या मागण्यांसाठी आंदोलनाच हत्यार उपसले. या आंदोलनाची दखल राज्य सरकारला अखेर घ्यावी लागली आहे. मुंबईतल्या आझाद मैदानावर अंगणवाडी सेविकांनी ठिय्या आंदोलन सुरु केले होते.
तर काही अंगणवाडी सेविका थेट रायगड किल्ल्यावर पोहोचल्या. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीसमोर आंदोलन केले. मुंबईतील आझाद मैदावर आंदोलन करणाऱ्या अंगणवाडी सेविका आक्रमक झाल्या होत्या. मागण्या पूर्ण होईपर्यंत मैदान सोडणार नसल्याचा पवित्रा अंगणवाडी सेविकांनी घेतलाय. राज्य सरकारनं साडेपाच तर केंद्रानं गेली साडेचार वर्षे मानधनात कुठलीही वाढ दिलेली नाही. यासह अनेक मागण्यासाठी अंगणवाडी सेविका आक्रमक झाल्या होत्या. त्यानंतर हा प्रश्न विधानसभेतही उपस्थित करण्यात आला.



अंगणवाडी सेविकांसाठी गोड बातमी

अंगणवाडी सेविकांसोबत राज्य सरकारने सकारात्मक चर्चा केली आहे. अंगणवाडी सेविकांना दीड हजार रुपये मानधन वाढवून मिळणार आहे. अंगणवाडी सेविकांसाठी सेवा समाप्तीनंतर पेन्शन योजनाही सुरु केली जाणार आहे. तसेच अंगणवाडी सेविकांना मोबाइल दिले जाणार आहेत. अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नाबाबत तातडीची बैठक घेण्यात आली. सेविकांचे शिष्टमंडळ आणि मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यात चर्चा सुरु झाली. मुख्यमंत्र्याच्या आदेशाने ही बैठक झाली. या बैठकीत आज तोडगा काढण्याबाबत प्रयत्न झालेत. त्यात यशही आले.

दरम्यान, माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी सरकारवर गंभीर आरोप केला होता. अंगणवाडी सेविका 28 जून2022 पगार वाढ करण्यासाठी फाईल अर्थ विभागकडे पाठवण्यात आली होती. त्यामध्ये 10हजार वाढण्यासाठी मागणी करण्यात आली होती. मात्र, आठ महिन्यांपासून फाईलकडे यासरकाने ढंकूनही पाहिले नाही, असे यशमोती ठाकूर यांनी आरोप करताना म्हटले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button