फर्निचरच्या गोदामाला भीषण आग,चार ते पाच घर आणि काही वाहनेही जळून खाक

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. संपर्क : 9226040506

नाशिक : नाशिकमध्ये आगीची मोठी घटना घडली आहे. शहरातील वडनेर दूमाल रोडवर एका फर्निचरच्या गोदामाला भीषण आग लागली. या आगीमध्ये गोदामाच्या बाजूला असलेली चार ते पाच घर आणि काही वाहनेही जळून खाक झाली.
नाशिकच्या वडनेर दूमाल रोडवर पहाटे तीन वाजेच्या सुमारास एम के फर्निचर मॉल आणि गोदामाला अचानक आग लागली. बघता बघता आगीने प्रचंड रौद्ररुप धारण केलं. लाकडी साहित्य असल्यामुळे आगची भडका उडाला.
फर्निचर मॉल आणि गोदाम आगीच्या भक्षस्थानी सापडले. आग इतक्या मोठ्या प्रमाणात पसरली की, दुकानाच्या बाजूला असलेली चार ते पाच घरांना हानी पोहोचली. काही वाहनंही या आगीत जळून खाक झाली.
फर्निचर गोदामाला आग लागल्यानंतर आतमध्ये असलेले पंधरा-वीस जण वेळीच बाहेर पडल्याने मोठी जीवितहानी टळली.

अवघ्या काही मिनिटात आगीने रौद्ररुप धारण केलं. नागरी वसाहतीत असलेल्या फर्निचर गोडाऊनला आग लागल्याने नागरिक संतप्त झाले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन ते चार बंबांनी आग विझवली आहे.
मात्र, या आगीत एम के फर्निचर मॉल आणि गोदाम जळून खाक झाले आहे.

या आगीच मॉलचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. फर्निचर मॉलच्या बाजूला असलेली चार ते पाच घर आणि काही वाहनेही आगीत जळून खाक झाली आहे. मात्र, आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप कळू शकले नाही. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

✍️✍️हे ही वाचा

लोकशाही न्युज  वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप

नवगण डोअर बीड  वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन

नवगण न्युज  वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या !