क्राईम

आठ वर्षाच्या चिमुकलीवर सामूहिक बलात्कार,बीड हादरलं


बीड : आठ वर्षाच्या चिमुकलीवर तीन अल्पवयीन मुलांनी अमानुषपणे अत्याचार केल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीनही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

बीड (Beed) शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ही घटना घडली आहे. एका हॉटेलच्या बाजूला असलेल्या पडक्या रूममध्ये नेऊन या तीनही मुलांनी अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, या तीनही मुलांना अटक केल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. तसेच, वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 14 वर्षे वय असलेल्या तिघा मित्रांनी एका आठवर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. रविवारी सायंकाळच्या सुमारास बीड शहरात ही घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

बीड शहरातील एका भागातील रहिवासी असलेली आठ वर्षीय पिडीत मुलगी आपल्या कुटुंबीयान सोबत राहते. तिचे वडील रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात, तर आई गृहिणी आहे. दरम्यान, रविवारी सायंकाळी पिडीत मुलगी घराजवळ खेळत होती. याचवेळी परिसरात राहणाऱ्या 14 वर्षीय असलेल्या तीन मित्रांनी तिला जवळच असलेल्या नदीच्या परिसरातील एका पडक्या घरामध्ये घेऊन गेले. त्यानंतर या मुलीवर आळीपाळीने बलात्कार केला. याचवेळी पीडितेने केलेला आरडाओरडा ऐकून रस्त्यावरुन जाणाऱ्या एका व्यक्तीने तिची मदत करण्यासाठी धाव घेतली. तसेच अल्पवयीन मुलांच्या तावडीतून मुलीची सुटका केली


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button