क्राईम

जमिनीचा जीवघेणा वाद, भांडणानंतर 5 जणांना ट्रॅक्टरने चिरडलं अन्…


बिहारमधील वैशाली येथील राघोपूर येथे जमिनीवरून दोन गटांमध्ये जोरदार भांडण झालं. धक्कादायक बाब म्हणजे यावेळी एका गटाने दुसऱ्या गटाच्या लोकांना ट्रॅक्टरने चिरडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पाच जण गंभीर जखमी झाले.

त्यांना तात्काळ राघोपूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले, तेथून त्यांना चांगल्या उपचारासाठी पाटणा एनएमसीएचमध्ये पाठवण्यात आले.

सोशल मीडियावर या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. रुस्तमपूर ओपी परिसरातील कर्मोपूर गावात ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दोन गटांमध्ये जमिनीच्या तुकड्यावरून जोरदार वाद सुरू झाला. मात्र या वादाचे नंतर मारामारीत रूपांतर झाले.

दोन्ही बाजूचे लोक एकमेकांना लाठ्या-काठ्यांनी मारू लागले. त्यानंतर एका गटाच्या व्यक्तीने दुसऱ्या गटातील लोकांवर ट्रॅक्टर चालवला. यामध्ये पाच जण गंभीर जखमी झाले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडली आहे.

दोन्ही गटाच्या तक्रारीवरून पोलिसांनी या प्रकरणी वेगवेगळा एफआयआर नोंदवला आहे. तसेच दोन्ही बाजूंच्या प्रत्येकी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी पुढील कार्यवाही सुरू आहे. याच दरम्यान, रुग्णालयात पाच जखमींची प्रकृती चिंताजनक


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button