मंदिराचे पुजारी यांना 10 दिवसात मंदिर सोडण्याची धमकी तसे न केल्यास परिणाम कन्हैयालाल सारखे

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


राजस्थानमध्ये (Rajasthan) हिंदू समाजातील लोकांना धमक्या मिळण्याचे प्रकार थांबत नाहीत. भरतपूर (Bharatpur) जिल्ह्यातून ताजं प्रकरण समोर आलं आहे. येथील एमएसजे कॉलेजमध्ये बनवण्यात आलेल्या मंदिराच्या पुजाऱ्याला दहा दिवसांत मंदिर सोडले नाही तर तुझा गळा चिरु अशी धमकी देण्यात आली आहे.
जर वेळीच ऐकला नाहीत, तर तुझा हाल कन्हैय्यालाल सारखा करु, असा इशाराही पुजाऱ्याला देण्यात आला आहे. पुजाऱ्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. त्याचबरोबर मिळालेल्या माहितीनुसार एबीव्हीपीकडून या घटनेच्या निषेधार्थ कॉलेजच्या गेटला टाळे ठोकून निदर्शने केली आहेत. माहितीनुसार, महाविद्यालयात बांधलेल्या मंदिराच्या भिंतीवर अज्ञात व्यक्तीने धमकीचे पत्र चिकटवले होते.

पोलिसांकडून तपास सुरु

सकाळी मंदिराचे पुजारी पूजा करण्यासाठी आले असता त्यांनी ते पत्र पाहिले. ज्यामध्ये 10 दिवसात मंदिर सोडण्याची धमकी देण्यात आली होती. तसे न केल्यास त्याचे परिणाम उदयपूरच्या कन्हैयालाल सारखे भोगावे लागतील, असे या पत्रात म्हटले आहे. याठिकाणी पुजाऱ्याच्या माहितीवरून पोलिसांनी मंदिराच्या भिंतीवर चिकटवलेला पत्र काढून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पोलिस आजूबाजूला लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासत आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल.