ताज्या बातम्या

मध्यप्रदेशात काँग्रेस अलर्ट मोडवर; ‘विजयी उमेदवारांनी भोपाळला या’ , कमलनाथ यांचे आदेश


राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि तेलंगणा या चार राज्यांचा निकालांचा कल समोर येण्यास सुरुवात आहे. आगामी लोकसभा निवडणुकांची रंगीत तालीम म्हणून ज्या निवडणुकांकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं होतं, त्या पाच राज्यांच्या निवडणुकांचे एग्झिट पोल सध्या कळीचा मुद्दा ठरले आहेत.

या एग्झिट पोलमध्ये मतदरांचा कल काँग्रेसला मिळाला आहे. आता निवडणुकांचे कल हाती येत असून मध्यप्रदेशात मतदारांचा कल हा काँग्रेसकडे असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर निकालाआधीच काँग्रेस अलर्ट मोडवर आहे. निकालानंतर विजयी उमेदवारांना भोपाळला येण्याचे आदेश कमलनाथ यांनी दिले आहे.

मध्यप्रदेश निकालाअधीच काँग्रेस अलर्ट मोडवर आहे. कमलनाथ यांनी सर्व विजयी होणाऱ्या उमेदवारांना निकालानंतर तातडीने भोपाळला येण्याचे आदेश दिले. विजय यात्रा नंतर काढा, आधी भोपाळला या असे आदेश कमलनाथ यांनी दिले आहे. कमलनाथ यांच्या आदेशानंतर मध्य प्रदेशमध्ये रिसॉर्ट पॉलिटिक्स पुन्हा होण्याची चर्चा सुरू झाली आहे. मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपला धोबीपछाड देत सत्ता खेचून आणली. मात्र, कमलनाथ यांच्या नेतृत्वातील सरकार ऑपरेशन लोट्समध्ये पाडण्यात आले. ज्योतिरादित्य शिंदे यांनी आपल्या आमदारांसह भाजपची वाट धरल्याने कमलनाथ यांचे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करू शकले नाही.

भाजपनं पहिल्यांदाच कोणत्याही नावाची घोषणा नाही

मध्यप्रदेशात ऑपरेशन लोटसचा यशस्वी प्रयोग करत 2018 साली गेलेली सत्ता पुन्हा मिळवत भाजपनं पुन्हा एकदा शिवराज सिंह चौहान यांना मुख्यमंत्री केलं. मात्र, या निवडणुकीत भाजपला केंद्रीय मंत्र्यांना विधानसभेसाठी उतरवण्याची वेळ आली. प्रत्येक निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा देणाऱ्या भाजपनं पहिल्यांदाच कोणत्याही नावाची घोषणा नाही.तर काँग्रेसने मध्य प्रदेशातली निवडणूक ज्येष्ठ नेते कमलनाथ सेंट्रिक केली. कमलनाथ यांनी सॉफ्ट हिंदुत्ववादी भूमिका घेत, शिवराज यांच्या नीतींचा विरोध केला. त्यातच राहुल गांधी यांनी जातीय जनगणनेचा मुद्दा प्रचारात आणत भाजपसमोर मोठं आव्हान उभं केलं. ऑपरेशन लोटस, आदिवासींचे हक्क आणि शिवराज यांच्या विरोधातील नाराजी.. याच मुद्दांना प्रचारात केंद्रस्थानी आणत काँग्रेसनं सत्तेसाठी मोठी दावेदारी उभी केली.

 

मध्यप्रदेशात भाजप 150 ते 160 जागा जिंकेल असा विश्वास मध्यप्रदेशातले मंत्री नरोत्तम मिश्रा यांनी व्यक्त केला आहे. भोपाळ पाठोपाठ कमलनाथ यांचे गृहनगर असलेल्या छिंदवाडा येथे कमलनाथ याच्या अभिनंदनाचे होर्डिंग लागले आहे. नागपूर छिंदवाडा रोडवर हे होर्डिंग लागले आहे याचा आढावा घेतला.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button