ताज्या बातम्या

रविवारी 5 नाही तर 4 राज्यांचे निकाल, निवडणूक आयोगाचा शेवटच्या क्षणी निर्णय


लोकसभा निवडणुकीची सेमी फायनल म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पाच राज्यांमध्ये मतदान पार पडलं. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांसाठी झालेल्या निवडणुकींची मतमोजणी रविवारी होणार होती, पण आता फक्त पाच राज्यांचेच निकाल रविवारी येणार

मिझोराम राज्याच्या निवडणूक निकालाची तारीख निवडणूक आयोगाने शेवटच्या क्षणी बदलली आहे. मिझोराम निवडणुकीच्या निकालांची तारीख बदलण्याची मागणी केली जात होती, यानंतर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे.
रविवार ख्रिश्चनांचा पवित्र दिवस असतो, मिझोराममध्ये ख्रिश्चन धर्मियांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर आहे, त्यामुळे मिझोरामध्ये निकालाच्या तारखा बदलाव्यात ही मागणी सर्वपक्षीयांनी केली होती.
मिझोराम विधानसभेच्या 40 जागांसाठी 7 नोव्हेंबर 2023 रोजी मतदान झालं. 174 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. मिझो नॅशनल फ्रंट, जोरम पीपल्स मूव्हमेंट आणि काँग्रेस हे तिथले प्रमुख पक्ष आहेत. 23 जागांवर भाजपने इतरांसाठी चुरशीची स्पर्धा निर्माण केली आहे. दरम्यान, सुमारे 12 जागांवरच्या उमेदवारांचं टेन्शन ‘नोटा’मुळे वाढलं आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी 7 जागांवर 100हून अधिक मतं ‘नोटा’ला मिळाली होती. तसंच, 2 जागांवर 200हून अधिक मतं ‘नोटा’ला मिळाली होती. एका सीटवर तर नोटा हे पराजयाचं कारणही बनलं. त्यामुळे या वेळी उमेदवारांचं ‘नोटा’कडे लक्ष आहे. 2013मध्येही तुइकुम जागेवर काँग्रेस उमेदवाराला ‘नोटा’मुळे हार पत्करावी लागली होती.
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, 2013मध्ये आदिवासींसाठी राखीव असलेल्या तुइकुम जागेवर मिझो नॅशनल फ्रंटच्या लालरिनवामा यांना 4467 मतं मिळाली होती. काँग्रेसच्या निलजुआला यांना 4453 मतं मिळाली होती. नोटा पर्यायाला 78 मतं मिळाली होती. त्यामुळे मिझोराममध्ये नोटा हा पर्याय उमेदवारांच्या ताणाचं कारण बनला आहे.
मिझोराममधलं राजकारण
मिझोचा अर्थ डोंगराळ भागात राहणाऱ्या व्यक्ती. मिझोराम हे पर्वतीय राज्य आहे. इतिहासकार म्हणतात, की तिबेट-बर्मा इथलं मूळ असलेली बोली बोलणारे मिझो नागरिक मंगोल जातीच्या मोठ्या शाखेचा भाग आहेत. ते 1900 सालाच्या सुमारास पूर्व आणि दक्षिण भारतात आले होते.
1972 साली आसामातून मिझोराम आणि अरुणाचल प्रदेश ही राज्यं वेगळी काढण्यात आली होती. त्या वेळी मिझोरामला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला नव्हता. त्यानंतर तिथे आंदोलन सुरू झालं. दीर्घकालीन लढ्यानंतर मिझोरामला राजीव गांधी सरकारने पूर्ण राज्याचा दर्जा दिला. त्यासाठी भारतीय राज्यघटनेची 53वी घटनादुरुस्ती अंगीकारण्यात आली.
मिझोराम हे त्रिपुरा, आसाम आणि मणिपूरच्या सीमांनी वेढलेलं ईशान्य भारतातलं एक राज्य आहे. मिझोरामची 50 टक्क्याहून अधिक सीमा म्यानमार आणि बांगलादेश या शेजारी देशांना लागलेली आहे. हे राज्य ख्रिश्चनबहुल आहे आणि 2011च्या जनगणनेनुसार 87 टक्के लोकसंख्या ख्रिश्चन आहे.
मिझोराममध्ये ब्रू जमात आणि मुसलमानांचा दबदबा आहे. मिझोराममध्ये विधानसभेच्या 40 आणि लोकसभा-राज्यसभेच्या प्रत्येकी 1-1 जागा आहेत. लोकसभा आणि राज्यसभेच्या दोन्ही जागांवर एमएनएफ आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button