क्राईम

भाभीचं दीरासोबत जुळलं सुत, मोठ्या भावाला लागली खबर अन….


अनैतिक संबंधातून भावा-भावाच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे.

बिहारमध्ये (Bihar Crime News) अनैतिक संबंधातून एका तरुणाने आपल्याच मोठ्या भावाची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. नेमकं काय झालं होतं? प्रेमाची भांडाफोड कसा झाला अन् भावाने भावाला संपवण्याचा प्लॅन कसा रचला पाहुया…

सरोज यादव याचा मोठा भाऊ विनोद कुमार याचं नुकतंच लग्न झालं होतं. मात्र, कामानिमित्त त्याला नेहमी बाहेरगावी रहावं लागत होतं. त्यावेळी सरोज यादव याचं भावाच्या पत्नीसोबत सुत जुळलं. दोघांमध्ये अनैतिक संबंध होते. जेव्हा या गोष्टीची खबर मोठ्या भावाला लागली. त्यावेळी त्याने लहान भावाला मारहाण केली. त्यावेळी संतापलेल्या मोठ्या भावाने धाकट्या भावाला त्याच्या गावात येण्यासही मनाई केली होती. भावाकडून झालेल्या बदनामीचा राग सरोजच्या मनात होता. त्याने थेट मुंबई गाठली. भावाने केलेल्या मारहाणीचा राग त्याच्या मनात होता. त्याने भावाला संपवण्याचा निर्णय घेतला.

सरोजने गुन्हेगारांना हाताशी धरलं अन् थेट मधुबनी गाठलं. शुटर अजय ठाकूर याने दीड लाखाची सुपारी घेतली होती. मोबाईल अॅपद्वारे त्यांना तीस हजार रुपये अॅडव्हान्स देण्यात आले. तर हत्येनंतर चाळीस हजार रुपये देण्याचं ठरलं. त्यानंतर शुटरने आपलं काम केलं. लहान भावाने डोक्यात राग ठेऊन आपल्याच भावाचा काटा काढला.

या प्रकरणी पोलिसांनी धाकटा भाऊ सरोजकुमार यादव, सुशील मुखिया आणि शूटर अजय कुमार ठाकूर यांना अटक केली आहे. दरम्यान, दुसरा आरोपी देवन यादव हा फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेण्यात व्यस्त आहेत. अजय कुमार ठाकूर याच्याकडून पोलिसांनी देशी बनावटीचे पिस्तूल आणि तीन गोळ्या जप्त केल्याचे त्याने सांगितले. त्याचवेळी सुशील मुखियाच्या घरातून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button