क्राईम

मनाविरुद्ध मुलाला जन्म दिला म्हणून विवाहितेचा छळ,विवाहितेची आत्महत्या


सासरच्या मंडळीने तिचा शारीरिक व मानसिक छळ केला .सासरच्या या छळाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली आहे. ही घटना शनिवारी भोसरी येथील गवळी नगर परिसरात घडली.



याप्रकरणी भोसरी पोलिसांनी पती पवन प्रल्हाद तायडे (वय 29 रा. भोसरी) व महिला आरोपी यांना अटक केली आहे. तर सासरे प्रल्हाद लक्ष्मण तायडे (वय 66) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी मयत मुलीचे वडील रमेश रामभाऊ चोपडे (वय 53 बुलढाणा) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात रविवारी (दि.26) फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या मुलीला आरोपी हे मार्च 2020 पासून शारीरिक व मानसिक त्रास देत होते. फ्लॅट घेण्यासाठी माहेरून दहा लाख रुपये घेऊन ये , तसेच मनाविरुद्ध तू मुलाला जन्म का दिला या कारणावरून पिडीतेला वेळोवेळी शिवीगाळ व मारहाण केली जात होती.

पती व इतरांच्या त्रासाला कंटाळून पिडीतेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तिच्या या आत्महत्येला प्रवृत्त केल्या प्रकरणी भोसरी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button