ताज्या बातम्या

लग्न हे पवित्र नाते आहे पन महिलेने भावाशीच केले लग्न


लग्न हे पवित्र नाते आहे. आपल्या देशात लग्नाबाबत वेगवेगळे मतप्रवाह आहेत. लग्न करताना धर्म, जात, गोत्र अशा अनेक गोष्टींचा विचार केला जातो, त्यानंतर लग्न होते.

आपल्याकडे सहसा जवळच्या नातेवाईकांमध्ये लग्न करत नाहीत. यामागे एक महत्त्वाचे कारण आहे. लग्न करणाऱ्या व्यक्तींमध्ये रक्ताचे नाते असल्यास पुढच्या पिढीत जनुकीय दोष निर्माण होण्याचा धोका असतो.

अशातच आता एका अमेरिकन महिलेने भावाशीच केले लग्न केले आहे. 20 वर्षीय केन्ना हिने व्हिडिओ शेअर करत याविषयी माहिती दिली आहे. हे अमेरिकन जोडपे एकमेकांना डेट करत होते. 6 महिन्यांच्या डेटिंगनंतर त्यांना डीएनए चाचणीतून कळले की दोघेही चुलत भाऊ-बहिण आहेत. मात्र यामुळे केन्नाला काही फरक पडला नाही आणि तिने एका वर्षानंतर तिच्या प्रियकराशी म्हणजेच तिच्या चुलत भावाशी लग्न केले.

या जोडप्याचा हा निर्णय अनेकांना आवडला नाही. लोकांनी हे नाते नाकारले आणि त्यांना ट्रोल करण्यास सुरुवात केली. या जोडप्याचा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी म्हटले की, हे नाते केवळ बेकायदेशीर नाही तर असे नाते जेनेटिक्स बिघडवते. याबाबत लोकांनी विचारले असता या जोडप्याने सांगितले की, आम्हाला काही फरक पडत नाही कारण आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करतो. हे लग्न आता सामान्यांसाठी चर्चेचा विषय बनले आहे.

अमेरिकेतील युटा या राज्यातील हे जोडपे आहे. युटा हे अमेरिकेतील 24 राज्यांपैकी एक आहे जिथे चुलत भावंडांमधील विवाहावर बंदी आहे. मात्र असे विवाह न्यूयॉर्क आणि फ्लोरिडासह इतर 19 राज्यांमध्ये केले जाऊ शकतात. दरम्यान पतीसोबतचे बाँडिंग दाखवण्यासाठी केनाने आणखी एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये ती त्याला मिठी मारताना दिसत आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button