क्राईम

प्रियकराने लग्नास नकार दिल्याने तरूणीची आत्महत्या


लग्नाचे आमिष (Lure of Marriage) दाखवून तरुणीला तिच्या राहत्या घरातून पळवून नेले. यानंतर तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवले, मात्र नंतर प्रियकराने लग्नाला नकार दिल्याने एका 19 वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी प्रियकरावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत आत्महत्या करणाऱ्या तरुणीच्या 52 वर्षीय वडिलांनी (रा. राजुरी ता. पुरंदर) रविवारी (दि.26) लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) फिर्य़ाद दिली आहे. पोलिसांनी आदित्य अशोक जाधव Aditya Ashok Jadhav (रा. राजुरी ता. पुरंदर जि. पुणे) याच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शुक्रवारी (दि.24) सकाळी साडे अकराच्या सुमारास उरुळी देवाची येथे घडली आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी आणि आरोपी आदित्य जाधव हे एकाच गावचे आहेत. आरोपी आदित्य याने फिर्यादी यांच्या 19 वर्षाच्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला घरातून पळवून नेले. तिला लग्न करण्याचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापीत केले. यानंतर पीडित मुलीने आरोपीकडे लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने लग्न करण्यास नकार दिला. तसेच ‘तुला काय करायचे ते कर किंवा कुठे जावुन मर, मी तुझ्यासोबत लग्न करणार नाही’ असे बोलून तिला मानसिक त्रास दिला. यामुळे फिर्यादी यांच्या मुलीला नैराश्य आले. दरम्यान, मुलगी उरुळी देवाची येथे मामाच्या घरी आली. तिने नैराश्यातून मामाच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button