ताज्या बातम्या

भारत सरकार अलर्ट मोडवर; राज्यांना तयारीचा आढावा घेण्याचे निर्देष


चीनमध्ये पसरत असलेल्या गूढ आजाराच्या पार्श्वभूमीवर जगभरात चिंता पसरली आहे. लहान मुलांमध्ये गूढ न्यूमोनियासारखा आजार पसरत आहे. यादरम्यान भारत सरकार देखील चीनमध्ये पसरत असलेल्या या आजाराच्या परिस्थितीकडे बारकाईने लक्ष ठेवून आहे.

चीनमध्ये कोरोनानंतर सुरू झालेल्या नव्या गूढ आजाराने जगातील अनेक देश भयभीत झाले आहेत. याबद्दल डब्ल्यूएचओने इशाराही दिला आहे. या आजाराचा परिणाम मुलांवर जास्त झाला आहे. परिस्थिती अशी आहे की, सरकारने अनेक शाळा बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

या पार्श्वभूमिवर भारतातही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना कोरोनासदृश मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, घाबरून जाण्याची गरज नाही, फक्त नियमांचे पालन करत राहा, असेही म्हटले आहे. देशात सध्या अलर्टसारखी परिस्थिती नसल्याचेही सरकारने म्हटले आहे.

आरोग्य मंत्रालयाने या संबंधीत एक निवेदन जारी करण्यात आले आहे, त्यानुसार श्वसनासंबंधीत या आजार इन्फ्लूएंजा, मायकोप्लाज्मा न्यूमोनिया, SARS-CoV-2 सारख्या कारणांमुळे होत आहेय आरोग्य मंत्रालय या आजाराच्या स्थितीवर बारकाईने लक्ष देऊन आहे. सध्या काळजी करण्याची आवश्यकता नाही असेही सांगण्यात आले आहे.

भारतीय आरोग्य मंत्रालयाने २६ नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चीनमध्ये पसरणाऱ्या नवीन श्वसनाच्या आजाराचा रोगाचा धोका लक्षात घेता आम्ही देशाच्या सर्व भागांवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. मात्र, सरकारने याबाबत कोणताही इशारा देण्यास नकार दिला आहे. घाबरून जाण्याची गरज नाही, पण कोविड-१९ काळाप्रमाणे आरोग्यविषयक नियमांचे पालन केले पाहिजे असे सरकारने म्हटले आहे.

आरोग्य मंत्रालयाने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना तत्काळ सार्वजनिक आरोग्य आणि रुग्णालयाची स्थितीचा आढवा घेण्यास सांगितले आहे. यासोबतच मानवी संसाधने, रुग्णालयातील बेड, अत्यावश्यक औषधे, वैद्यकीय ऑक्सिजन, पीपीई, चाचणी किट इत्यादींची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्याच्या आवश्यकतेवर या निर्देशात भर देण्यात आला आहे.

याव्यतिरिक्त, आरोग्य सेवा सुविधांनी त्यांचे ऑक्सिजन प्लांट आणि व्हेंटिलेटरची उपलब्धता आणि संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी संक्रमण नियंत्रण प्रोटोकॉलचे काळजीपूर्वक पुनरावलोकन केले पाहिजे, असे आरोग्यमंत्र्यांनी आपल्या निर्देशात म्हटले आहे.

सर्व राज्यांना निर्देष

आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्य आणि केंद्र शाषित प्रदेशांना आजाराचा सामना करण्यासाठी रुग्णालयाच्या तयारीचा आढावा घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. राज्यांनी कोरोना काळात लागू करण्यात आलेल्या गाईडलाइन्सचे पालन करावे, जिल्हा आणि राज्यात सर्व आरोग्य केंद्रावर लक्ष ठेवलं जाईल. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत असेही सांगण्यात आले आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button