ताज्या बातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उडवलं तेजस फायटर विमान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेजस फायटर विमान उडवलं आहे. त्यांच्या या हवाई सफरीचे फोटो सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहेत. सोशल मीडियावर नरेंद्र मोदी यांच्या या फोटोंची चर्चा होतेय. शिवाय भारताने मागच्या काही काळात ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत काही लढाऊ शस्त्राांची निर्मिती केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेजस फायटर विमान उडवलं. कर्नाटकातील बंगळुरूत त्यांनी ही हवाई सफर केली.

नरेंद्र मोदी हे कायम मेक इन इंडियाला प्राधान्य देत असतात. त्याचाच एकभाग म्हणून त्यांनी आज ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत मल्टी-रोल फायटर जेटलाही मान्यता दिली आहे. बंगळुरु एयरबेसवर त्यांनी याची घोषणा केली.
नरेंद्र मोदी हे कायम मेक इन इंडियाला प्राधान्य देत असतात. त्याचाच एकभाग म्हणून त्यांनी आज ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत मल्टी-रोल फायटर जेटलाही मान्यता दिली आहे. बंगळुरु एयरबेसवर त्यांनी याची घोषणा केली.

देशाच्या रक्षणासाठी लागणारी सामग्री भारत परदेशातून आयात करतो. पण आता संरक्षण क्षेत्रातही भारतानं आत्मनिर्भर व्हावं, अशी पंतप्रधान मोदी यांची भावना आहे. त्यामुळे मल्टी-रोल फायटर जेटला त्यांनी मान्यता दिली आहे.

सध्या भारत स्वावलंबी होण्याकडे पावलं टाकत आहे. संरक्षणाशी संबंधित सामग्री परदेशातून आयात करणंही आता कमी झाली आहे. 2018-19 या काळात आपण 46 % संरक्षणाशी संबंधित गोष्टी परदेशातून आयात करत होतो. आता मात्र त्यात घट झाली आहे. 2022 मध्ये हा आकडा घसरून 36.7 टक्क्यांवर आलाय.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button