ताज्या बातम्या

भारतात क्रिकेट खेळण्यावर बंदी?मिचेल मार्शला विश्वचषक ट्रॉफीवर पाय ठेवन पडलं महागात


विश्वचषक जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी जल्लोष साजरा केला परंतु 20 नोव्हेंबरच्या सकाळपासून ऑस्ट्रेलियन अष्टपैलू मिचेल मार्शशी संबंधित वाद निर्माण झाला आहे. मिचेल मार्शने असे काही केले ज्यामुळे जगभरातील क्रिकेट चाहते त्याच्यावर टीका करत आहेत.

२०२३ च्या विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी जल्लोष साजरा केला, ज्याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. या व्हायरल झालेल्या छायाचित्रांपैकी एक मिशेल मार्शचा होता. व्हायरल झालेल्या चित्रात मार्श वर्ल्ड कप ट्रॉफीवर पाय ठेवून बसला होता. विश्वचषक जिंकण्यासाठी सर्व संघांनी मेहनत घेतली आणि शेवटी ऑस्ट्रेलियाला यश मिळाले. त्याचा आदर करण्याऐवजी मार्शने त्याच्यावर पाऊल टाकल्याने जगभरातून टीका झाली आणि आता हे प्रकरण कोर्टात पोहोचले आहे.

 

1
उत्तर प्रदेशातील आरटीआय कार्यकर्ते पंडित केशव यांनी मिशेल मार्श यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. यूपीच्या अलीगड जिल्ह्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफआयआरमध्ये असे म्हटले आहे की, फायनल जिंकल्यानंतर मार्शने विश्वचषक ट्रॉफीवर पाय ठेवल्याच्या फोटोने करोडो भारतीय क्रिकेट चाहत्यांची मने दुखावली आहेत. मार्शला भविष्यात भारतात क्रिकेट खेळण्यावर बंदी घालण्याच्या विनंतीसह एफआयआरची प्रत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्यात आली आहे.

विश्वचषक 2023 चे विजेतेपद जिंकल्याच्या अभिमानाने, मिचेल मार्शने निश्चितपणे ट्रॉफीवर पाय ठेवून त्याचे फोटो क्लिक केले परंतु अंतिम जिंकण्यात त्याचे योगदान शून्य होते आणि तो फ्लॉप ठरला. फलंदाजी करताना त्याला 15 चेंडूत केवळ 15 धावा करता आल्या. केएल राहुलकडे झेल घेत बुमराहने त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button