क्राईम

रस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात अपघात, शरद पवार गंभीर जखमी


धावपळीच्या जीवनात कुणाचा कुठे अपघात होईल व कुठल्या दवाखान्यात उपचार घ्यायची वेळ येईल हे सांगता येत नाही. दोन महिन्यापूर्वी शरद पवार त्यांच्या वाहनाने वणीवरून मारेगावला जात असताना रस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात असताना त्यांच्या वाहनाला अपघात झाला.

त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना प्राथमिक उपचारासाठी मारेगाव येथील आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. परंतु गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालय चंद्रपूर, मेडिकल नागपूर, कस्तुरबा गांधी हॉस्पिटल सेवाग्राम व काल 23 रोजी गंभीर अवस्थेत सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालय सावंगी मेघे येथील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे फडे तयार करून कुटुंब चालवणार्‍या Sharad Pawar शरद पवार यांच्या पत्नीची पतीचा जीव वाचवण्यासाठी असलेल्या धडपडीची परिसरात चर्चा आहे.

आजनसरा ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या सोनेगाव राऊत येथील शरद पवार पत्नीसह यवतमाळ जिल्ह्यातील वणी सासुरवाडीत दुचाकीने जात असताना रस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. त्यात Sharad Pawar शरदच्या मनक्याला गंभीर जखम झाली. त्याच्यावर मारेगाव येथील आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले

परंतु, प्रकृती गंभीर असल्याने नागपूर मेडिकल येथे दाखल करण्यात आले. तिथे 10 दिवसांच्या उपचारानंतर तब्बेतीत सुधारणा होत नसल्याने सुट्टी देऊन घरी पाठविण्यात आहे. परंतु, सावित्रीने यमराजा जवळून सत्यवानाचे प्राण वापस आणले त्याच प्रमाणे Sharad Pawar शरदची पत्नी राखी पवार कलियुगातील सावित्री बनून पती राज्याचे प्राण वाचवण्यासाठी गंभीर अवस्थेतही अनेक दवाखान्यात घेऊन फिरत आहे. काल 23 रोजी सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अतिक्षता विभागात उपचार सुरू आहेत. यासंमधीचे व्रत्त तरुण भारत ने प्रकाशीत केले आहे


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button