ताज्या बातम्या

तब्बल ११ दिवसांनी ब्रश करून बदलले कपडे, सांगितला एक-एक दिवसाचा थरार


उत्तराखंड येथे बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांना बाहेर काढण्यासाठी अद्याप प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, १२ ते १३ दिवसांपासून बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांनी काल दात घासले आणि कपडेही बदलले.



अत्यावश्यक खाद्यपदार्थांबरोबरच कपडे आणि औषधेही कामगारांना काल पाठवण्यात आली. एनएचआयडीसीएलचे एमडी महमूद अहमद म्हणाले की, कामगारांना चार आणि सहा इंची लाईफ पाईप्सद्वारे अन्नपदार्थ सतत पाठवले जात आहेत.

बुधवारी त्यांना रोटी, भाजी, खिचडी, दलिया, संत्री आणि केळी पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे. टी-शर्ट, अंडरगारमेंट, टूथपेस्ट आणि ब्रशसोबतच त्यांना साबणही पाठवण्यात आला. कामगारांनी कपडे बदलले, हात धुतले आणि जेवण देखील केले.

संवाद साधण्याचीही केली व्यवस्था

आतापर्यंत बोगद्याच्या आतील कामगारांचे स्वरूप केवळ दुर्बिणीच्या कॅमेऱ्यांद्वारेच दिसत होते, मात्र बुधवारी दिवसभरात एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या टीमने येथे ऑडिओ सिस्टीमही बसवली आहे. त्यासाठी बोगद्याच्या आत सहा इंची पाईपद्वारे मायक्रोफोन आणि स्पीकर पाठवण्यात आले. सर्व कामगारांशी बोलून डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
  • .
Back to top button