शाळकरी मुलीवर घरात घूसून चाकूच्या धाकावर वारंवार बलात्कार,मुलीच्या अंगावर सिगारेटचे चटके
संतापजनक घटना समोर आली आहे. ११ वर्षीय शाळकरी मुलीवर घराशेजारी राहणाऱ्या नराधमाने घरात घूसून चाकूच्या धाकावर वारंवार बलात्कार केला. अकोला शहरातील कैलास टेकडी परिसरातहा प्रकार घडला आहे.
नराधमाने मुलाच्या अंगावर सिगारेटचे चटके देत कात्रीने तिचे केसही कापल्याचे समोर आले आहे. पीडितेच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ वर्षीय पीडिता शहरातील कैलास टेकरी परिसरात राहते. मुलीचे आई-वडील मोलमजुरी करतात. एके दिवशी घरात कोणी नसल्याचे पाहून नराधन मुलीच्या घरात शिरला व त्याने चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केला. या प्रकाराने भेदरलेल्या मुलीने याची वाच्याता कुठेही केली नाही. या गोष्टीचा फायदा घेत आरोपीने पीडितेचं वारंवार लैगिंक शोषण केलं. इतकचं नाही, तर आरोपीने पीडितेला सिगारेटचे चटके दिले तसेच तिच्या डोक्यावरचे केसही कापल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
आरोपीचा त्रास असह्य झाल्यानं मुलीची या प्रकाराची माहिती आई-वडिलांना दिली. त्यानंतर पीडितेच्या पालकांनी तत्काळ पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी नराधम आरोपीविरोधात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी पीडितेच्या वडिलांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल होताच आरोपीच्या मुसक्या आवळल्या. या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी त्यांनी खदान पोलिसांकडे केली आहे.