ताज्या बातम्या

मुलीचा मृतदेह कबरीतून बाहेर काढला आणि रात्रभर तिच्यासोबत झोपला अन..


लखनऊ : अतिशय हादरवून टाकणारं प्रकरण नुकतंच समोर आलं आहे. वाराणसीच्या रेवाडी तलाव येथे एका तरुणाने 5 वर्षाच्या मुलीचा मृतदेह कबरीतून बाहेर काढला आणि रात्रभर तिच्यासोबत झोपला.आजारपणामुळे 15 तारखेला मुलीचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. यानंतर रेवाडी तलावातील कब्रिस्तानामध्ये तिला दफन करण्यात आलं होतं.

शुक्रवारी सकाळी मयत मुलीचे वडील स्मशानभूमीजवळून गेले असता त्यांना कबरीतील माती बाजूला पडलेली असल्याचं आणि मृतदेह गायब असल्याचं दिसलं. हे पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी आपल्या मुलीच्या मृतदेहाचा इकडे-तिकडे शोध घेतला असता एक तरुण आपल्या मुलीच्या मृतदेहासोबत पडलेला दिसला. हे पाहून त्यांना धक्काच बसला. त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली.

घटनास्थळी पोहोचल्यानंतर आरोपी मोहम्मद रफिक दारूच्या नशेत असल्याचं पोलिसांना आढळून आलं. कोणाला काही संशय येऊ नये म्हणून त्याने मुलीचा मृतदेह बाहेर काढून कबरीवर माती टाकली होती. मात्र कबरीवर विखुरलेली माती पाहून वडिलांना संशय आला. पीडित कुटुंबाने मुलीच्या मृतदेहासह बलात्काराची फिर्याद दिली आहे. पोलिसांनी मुलीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आणि आरोपीची वैद्यकीय तपासणीही केली. ज्यामध्ये मद्यपान केल्याची पुष्टी झाली आहे.

या घटनेनंतर पीडित कुटुंब आणि ग्रामस्थांमध्ये संतापाचं वातावरण आहे. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी सर्वजण करत आहेत. याबाबत एसीपी अवधेश पांडे यांनी सांगितलं की, मुलीचा मृतदेह कबरीतून बाहेर काढल्याचं प्रकरण समोर आलं आहे. रात्री 2 वाजता आरोपीनी मृतदेह बाहेर काढला होता. आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून, पीएम रिपोर्ट आल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button