आमदार, मंत्र्यांना गावबंदी! महाराष्ट्र तुमच्या सातबाऱ्यावर लिहिलाय का?
जालन्यातील अंबड इथं ओबीसी आरक्षण बचाव एल्गार सभेत बोलताना भुजबळांनी मनोज जरांगे यांच्यावर निशाणा साधला. तसेच राजकीय नेत्यांना, मंत्र्यांना गावबंदी केली त्यावर भुजबळांवर भूमिका मांडली. असं करताना महाराष्ट्र तुमच्या सातबाऱ्यावर लिहून दिला आहे का? असा सवालही त्यांनी केला.
भुजबळ म्हणाले, “काय चाललंय या पोलिसांचं आमदारांना गावबंदी, मंत्र्यांना गावबंदी! काय महाराष्ट्र तुमच्या सातबाऱ्यावर लिहून दिलाय काय रे? तुम्ही मेसेज करता आमचा बोर्ड फाडला मग तुमचे हात कुठे गेले? जशास तसं उत्तर द्यावं लागेल. मी सांगितलं ‘करेंगे या मरेंगे’ हा तुमचा पाहुणा म्हणतो हा हिंसाचार आहे. पण हे तर महात्मा गांधींचं वाक्य आहे. पण जरांगे तर म्हणतात की, ‘लढेंगे और जितेंगे…’वारे वारे वा”
पोलिसांना आवाहन
माझं पोलिसांना आवाहन आहे की, हे गावागावात लावलेले गावबंदीचे फलक ताबडतोब हटवले पाहिजेत. हे लोकशाहीचं राज्य आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना माझं सांगण आहे. आज आमदार, राजकीय नेते गावात यायचं नाही हे दोनचार मुलं काहीतरी लावतात आणि धांदल करतात. हे असं यापुढं चालणार नाही. (Marathi Tajya Batmya)
सरकार आहे की नाही? कायदा आहे की नाही? तुम्ही जर असा पक्षपातीपणा कराल तर ओबीसी देखील गप्प बसणार नाही. ओबीसींच्या जोडीला दलित-मुस्लीम-आदिवासी सर्व एकवटल्याशिवाय राहणार नाही. पण ही दादागिरी बंद करु, असंही यावेळी भुजबळ म्हणाले.
अरे काय चाललंय? मला तर रोज धमक्या, शिवीगाळ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना शिवीगाळ होतेय. पोलिसांना तक्रार केलं तरी काही होत नाही. बस येऊन जाऊन येवल्यात कसा निवडून येतो ते बघतो असं म्हणतात. काय बघतोस तू? काय चार पोरं निघतात आणि याचा राजीनामा घ्या त्याचा राजीनामा घ्या म्हणतात.
काहीजण मला म्हणतात भडकाऊ भाषण नका करु? पण मी कधी भडकाऊ भाषण केलं. मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ३० वर्षे मराठ्यांसोबत राहिलो कधी त्यांचा द्वेष केला. पण त्यांनी केलेलं चालतं का?, अशा शब्दांत छगन भुजबळांनी भूमिका मांडली.