क्राईम

विवाहितेचे शारीरिक शोषण करणाऱ्या मौलानाचा व्हिडीओ व्हायरल; संतप्त नागरिकांकडून चोप


विवाहितेचे शारीरिक शोषण करणाऱ्या मौलानाविरोधात (FIR Against Maulana) पोलिसांमध्ये (Latur Police) गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी 22 वर्षीय विवाहितेने तक्रार केली होती.धक्कादायक बाब म्हणजे या पीडितेवर मौलानाकडून तिच्यावर वयाच्या अकराव्या वर्षापासून अत्याचार सुरू होते. व्हिडिओ समोर आल्यानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी मौलानास चोप दिला. या प्रकरणी विवेकानंद चौक पोलिसात गुन्हा दाखल आहे. मौलाना इस्माईल करीम शेख उर्फ मौलाना कासमी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असून कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

लातूर शहरातील गावभागातील एक 22 वर्षीय विवाहिता मागील दहा वर्षापासून शारीरिक शोषण करणाऱ्या मौलानाच्या त्रासाला कंटाळून गेली होती. या त्रासातून सुटका मिळावी यासाठी मौलानास पुराव्यासह पकडण्यासाठी त्याचा एक व्हिडिओ करण्यात आला होता. तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता समाजातून मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे.

विवाहित पीडित ही बावीस वर्षाची आहे. लातूर शहरातील गाव भागात ही विवाहिता पती दीर आणि सासऱ्यासोबत राहते. तिचे हे दुसरे लग्न आहे. पहिले लग्न न टिकल्याने त्यांचा घटस्फोट झाला होता. या आरोपी मौलना कासमीमुळे तिचा दुसरा विवाहही संकटात आला होता. या मौलानाचे लातूर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी मदरसे आहेत. याच मदरशामध्ये वयाच्या अकराव्या वर्षापासून शिक्षण घेणाऱ्या पीडितेवर या मौलानाची वाईट नजर होती. त्यावेळेस पासून मुलांना सातत्याने पीडितेचे शारीरिक शोषण केलं आहे. पहिले लग्न ही मौलानाने लावून दिलं आणि काडीमोड ही करायला लावला होता. दुसरे लग्न ही लावण्यात ह्याच मौलानांचा पुढाकार होता.

सासरच्या लोकांना घेतले विश्वासात…

या पीडितेचा दुसरा विवाह झाल्यानंतर मौलाना सातत्याने फोनवर संभाषण करत होता. भेटायला ये..आपण बाहेर जाऊ असे सांगून त्रास देत होता. पीडितेने सदर बाब आपल्या घरातील लोकांना सांगितली. याची माहिती कळल्यानंतर त्यांना विश्वास बसणं शक्य नव्हतं. सासरा पती आणि दीरास याची माहिती कळल्यावर त्यांना धक्काच बसला. मग सदर घटनेचा एक व्हिडिओ करण्यात आला. व्हिडिओ काही लोकांनी पाहिला. तो व्हिडिओ व्हायरल झाला. संतप्त लोकांनी मौलाना कासमी यांना धक्काबुक्की करत मारहाणीचा प्रयत्न ही केला होता. सदर घटनेची माहिती विवेकानंद पोलिसांना कळाल्यानंतर तात्काळ कारवाई करण्यात आली.

यानंतर पीडितेने तक्रार दाखल केली. विविध ठिकाणी नेऊन अत्याचार केले. शिवाय, लातुरातील घरीही अत्याचार केले. तो मोबाइलवर सतत बोलत होता. तुला मला भेटायचे आहे असे सांगत होता. अखेर त्रासाला कंटाळलेल्या पीडितेने याबाबतचे कथन पतीकडे केले. मौलाना घरी आल्यावर पुरावा म्हणून चित्रीकरण केले. हे चित्रीकरण पाहून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यासंमधी चे व्रत्त ABP न्युज ने प्रकाशीत केले आहे

बड प्रस्थ असलेल्या मौलाना विरोधात समाजात मोठा रोष

वयाची सत्तरी पार केलेले मौलाना ईस्माईल करीम शेख ऊर्फ मौलाना कासमी हे मुस्लिम समाजातील बड प्रस्थ आहे. त्यांच्या देखरेखेखाली जिल्ह्यात सात मदरसे चालतात. त्यांच्या इतर नातेवाईकांच्या नेतृत्वात ही जिल्ह्याभरात अनेक मदरसे आहेत. ईदच्या दिवशी होणाऱ्या सामूहिक प्रार्थनेत कायमच बयान देण्यासाठी त्यांची हजेरी प्रामुख्याने असते. सामाजिक राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांची चांगलीच पकड आहे. संपूर्ण भारतच नव्हे तर पाकिस्तान बांगलादेश मलेशिया सारख्या ठिकाणीही त्यांनी धर्मप्रसारासाठी भेटी दिल्या आहेत. मोठ्या प्रमाणात येथून त्यांना देणगी येत असते. त्यामुळे आर्थिक सुबत्ता त्यांच्याकडे भरपूर आहे. अशा व्यक्तीच्या दुष्कृत्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने समाजात संतप्त भावना आहे.

लातूर शहरातील हे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व होतं. धर्माच्या नावावर यांनी मोठ्या प्रमाणामध्ये निधी गोळा केला आहे. ट्रस्टच्या नावाच्या ऐवजी स्वतःच्या नावाने जमिनी खरेदी करण्याचा भ्रष्टाचार त्यांनी कायमच केला आहे. आता गरीब अनाथ मुलींची शाळा चालवण्याच्या नावाखाली त्यांचं शोषण करणाऱ्या या व्यक्तीची सखोल चौकशी झाली पाहिजे. आमच्यासारख्या व्यापाऱ्यांनी लाखो रुपये निधी दिला आहे त्याचा गैरवापर करणाऱ्याची कसून चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी व्यापारी फैयाज पटेल यांनी केली आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button