क्राईम

Video : धावत्या कारमध्ये तरुणांनी फोडले फटाके; व्हिडीओ तुफान व्हायरल


फटाक्यामुळं होणाऱ्या अपघातांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.अशाचत सोशल मीडीयावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये चालू गाडीत बसून काही व्यक्ती फटाके फोडत आहेत .हा व्हिडिओ बघून नेटकऱ्यांनी सतांप व्यक्त केलाय . 

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की ,रस्त्यावर अनेक कार धावत आहेत . त्यापैकी रस्त्यामधील एका काळ्या कारमधील हा प्रकार आहे .व्हिडिओत त्या कारचा दरवाजा उघडा आहे .एक तरूण कारच्या उघड्या दवाजात उभा राहून कारच्या वर ठेवलेले फटाके सतत फोडत आहेत .तसंच या कारची नंबर प्लेट ही गायब आहे आणि कारवर लाल- निळा पोलिस लाईट्सही आहेत. मागून येणाऱ्या दुसऱ्या कारमधील बसलेल्या काही लोकांनी त्याचा व्हिडिओ बनवलाय.
@Sahilrukhaya7 या ट्वीटर काउंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय .हा व्हिडिओ हरियाणातील गुरूग्रामधील आहे .मात्र फटाके फोडणारा तरूण कुठला आहे समजू शकले नाही .तसंच गाडी कोणाची आहे हेही समजू शकल नाही. या सारख्या तरूणामुळं नेहमी काहीना काही अपघात होत असतात ,तरी सुध्दा असा वेडेपणा बंद होण्याच नाव नाही . हा वेडेपणा आपल्या जीवावर बेतू शकतो हेही त्यांना समजत नाही .


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button