ताज्या बातम्या

भारताकडून नियम अधिक कडक, पाहता क्षणीच खाली पाडण्याचे आदेश..


इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारत ही आता सावध झाला आहे. भारत सरकारने हँग ग्लायडरच्या वापराबाबतचे नियम अधिक कडक केले आहेत. आता हँग ग्लायडर परवानगीशिवाय उडवले तर ते खाली पाडण्याचे आदेश देण्यात आले आहे.इस्रायलवर हमासने ज्या प्रकारे हल्ला केला त्यानंतर भारत ही अलर्ट झाला आहे. इस्रायलवरील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतातील डीजीसीएने राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने हँग ग्लायडिंगचे नियम आता आणखी कडक केले आहेत. भारतात हँग ग्लायडर उडवण्यासाठी DGCA ची परवानगी आवश्यक असेल. परवानगीशिवाय त्याची विक्री देखील करता येणार नाही. हँग ग्लायडर्स पायलटना सर्व निकष पूर्ण करावे लागतील आणि परवान्याच्या आवश्यकता देखील पूर्ण कराव्या लागतील.

DGCA ची परवानगी घ्यावी लागणार

नवीन नियमांनुसार, भारतीय आकाशात हँग ग्लायडर उडवण्यासाठी डीजीसीएची परवानगी घ्यावी लागणार आहे. अनधिकृत हँग ग्लायडर फ्लाइटचे गंभीर परिणाम होतील. यात ग्लायडर खाली पडण्याचे आदेश ही देण्यात आले आहेत. खासगी हँग ग्लायडर विकण्यासाठी डीजीसीएकडून परवानगी घ्यावी लागणार आहे. यासाठी सर्व कागदपत्राची पूर्तता करावी लागेल. ग्लायडरच्या संभाव्य खरेदीदारांना आता केंद्रीय गृह मंत्रालयाकडून मान्यता प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. जेणेकरून खरेदी करणाऱ्या व्यक्तीचीही चौकशी केली जाईल.

हँग ग्लायडर पायलटसाठी कठोर सुरक्षा आवश्यकता देखील पूर्ण कराव्या लागतील. म्हणजे हँग ग्लायडरला किमान ५० तास उडण्याचा अनुभव असावा. तसेच, ट्विन-इंजिन ग्लायडरसाठी, एखाद्याला किमान 10 तास उडण्याचा अनुभव असणे आवश्यक आहे. जे व्यावसायिक वैमानिक म्हणून काम करतील त्यांना किमान 25 तासांचा उड्डाणाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

 

हँग ग्लायडर म्हणजे काय?

हँग ग्लायडर इंजिनशिवाय हलकी उडणारी मशीन म्हणून काम करतात. हे सहसा साध्या, त्रिकोणाच्या आकाराच्या पंखांवर विसावून हवेत उडतात. वर, खाली किंवा बाजूला जाण्यासाठी पायलट त्यावर नियंत्रण ठेवतो. हवेत उडतानाच हा थरार अनुभव असतो. लोक हे खूप मजेदार आणि साहसी छंद म्हणून याचा वापर करतात. आकाशातून डोंगराळ भाग आणि सुंदर नैसर्गिक ठिकाणे पाहण्याचा अनुभव याद्वारे घेता येतो.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button