ताज्या बातम्या

एक शहर जिथं प्रत्येक बिल्डिंगचं तोंड पूर्वेला आहे,लोक चक्क संस्कृतमध्येच बोलतात..


महर्षि वैदिक सिटी (MVC) हे जेफरसन काउंटी , आयोवा , युनायटेड स्टेट्स मधील एक शहर आहे. 2020 च्या जनगणनेच्या वेळी लोकसंख्या 277 होती . 2001 मध्ये या शहराचा “वैदिक शहर” म्हणून समावेश करण्यात आला, परंतु त्यानंतर पाच महिन्यांनंतर अधिकृतपणे त्याचे नाव “महर्षि वैदिक सिटी” असे बदलले. 1982 पासून आयोवामध्ये समाविष्ट होणारे हे पहिले शहर आहे. महर्षि वैदिक शहरामध्ये अंदाजे एक चौरस मैल आहे, जे फेअरफिल्डच्या उत्तरेस चार मैलांवर स्थित आहे , महर्षी व्यवस्थापन विद्यापीठाचे निवासस्थान आहे .



जगात अशी बरीच ठिकाणं आहेत, ज्यांचं वैशिष्ट्य थोडं विचित्र आहे. असंच हे एक शहर जिथं प्रत्येक बिल्डिंगचं तोंड पूर्वेला आहे.

हे शहर आहे अमेरिकेत. आश्चर्य म्हणजे यूएसमध्ये असलेल्या या शहरातील लोक चक्क संस्कृतमध्येच बोलतात. हे अजब शहर कोणतं, त्याचं आणखी कायकाय वैशिष्ट्य आहेत ते पाहुयात.

अमेरिकेतील आयोवा राज्यात एक शहर आहे, जे प्राचीन हिंदू प्रथांचं पालन करतं. जिथं रहिवासी एकमेकांशी संस्कृतमध्ये बोलतात आणि दिवसातून दोनदा ध्यान करतात. या शहराचे नाव महर्षी वैदिक शहर आहे, जे इतर कोणत्याही शहरासारखं नाही. इथं सर्व इमारती पूर्वेकडे तोंड करून उभ्या आहेत. इथं नॉन ऑरगॅनिक अन्नावर बंदी आहे. याला अमेरिकेचं ‘सर्वात असामान्य’ शहर म्हटलं जातं. डेलीस्टारच्या वृत्तानुसार, अभिनेत्री ओप्रा विन्फ्रेने एकदा महर्षी वैदिक सिटीला अमेरिकेतील सर्वात विचित्र शहर म्हटलं होतं.

या शहराची स्थापना 2001 मध्ये ट्रान्सेंडेंटल मेडिटेशनचे संस्थापक दिवंगत महर्षी महेश योगी यांनी केल होतं. आयोवामधील हे सर्वात नवीन शहर असू शकतं. हे शहर वेदांच्या तत्त्वांवर आधारित आहे.

महर्षी वैदिक नगरीत राहणारे बहुतेक लोक संस्कृत भाषा बोलतात. येथील लोकांची दैनंदिन दिनचर्या महर्षी महेश योगी यांच्या ट्रान्सेंडेंटल मेडिटेशनच्या शिकवणींभोवती फिरते, ज्याचा त्यांचा विश्वास होता की ते जगात शांती आणू शकतात. या शहरात राहणारे लोक दिवसातून दोनदा ध्यान करतात, ज्यामध्ये ‘योगिक फ्लाइंग’ देखील समाविष्ट आहे. यामध्ये लोक पाय क्रॉस करून बसून हवेत उडी मारली दाते. पुष्कळ लोक महर्षी गोल्डन डोम्स ज्याला गोल्डन डोम असंही म्हणतात, तिथं रोजच्या ध्यानासाठी जातात.

गोल्डन डोम्स महर्षी इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी (MIU) च्या कॅम्पसमध्ये 1980 आणि 1981 मध्ये बांधलेल्या दुहेरी इमारती आहेत. यापैकी एका इमारतीत पुरुष ध्यान करतात तर दुसऱ्या इमारतीत महिला ध्यान करतात. 2020 च्या जनगणनेनुसार, केवळ साडेतीन चौरस मैल ग्रामीण जमिनीवर असलेलं हे छोटे शहर आता फक्त 277 लोकांचं घर आहे. महर्षी वैदिक स्थापत्यशास्त्राच्या तत्त्वांनुसार संपूर्ण शहराची रचना करण्यात आली आहे. त्यामध्ये असलेल्या सर्व इमारतींचे मुख्य प्रवेशद्वार उगवत्या सूर्याकडे म्हणजेच पूर्वेकडे आहे, जेणेकरून पुरेसा सूर्यप्रकाश खोल्यांपर्यंत पोहोचेल.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
  • .
Back to top button