देश-विदेश

गाझामध्ये घुसणं महागात पडेल, हा काही बगिचा नाही,हमासची इस्राइलला धमकी


इस्राइलने गाझापट्टीमध्ये केलेल्या तुफानी हल्ल्यादरम्यान, हमासने इस्राइलला उघड धमकी दिली आहे. गाझापट्टी म्हणजे काही बगिचा नाही. इथे घुसणं महागात पडेल. आम्ही इस्राइलमध्ये आपले १२०० योद्धे पाठवले होते.



आमची संघटना भक्कम आहे. इस्राइली सैनिकांच्या तैनातीला आम्ही घाबरत नाही. गाझामध्ये इस्राइली सैनिकांच्या कुठल्याही संभाव्य तैनातीचा सामना करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. गाझामध्ये इस्राइलकडून बॉम्बफेक सहाव्या दिवशीही सुरू आहे. आम्ही घाबरत नाही. आम्ही दृढ लोक आहोत. हा आमचा दृढसंकल्प आहे. आमच्याजवळ खूप योद्धे आहेत. तसेच अनेक लोकांचा आम्हाला पाठिंबा आहे.

हमासने इस्राइलला इशारा देताना सांगितले की, इस्राइलने गाझामध्ये घुसण्याचा प्रयत्न करू नये. इस्राइली सैन्याला आम्ही घाबरत नाही. गाझा म्हणजे काही बगिचा नाही. इथं फिरणं महागात पडेल. आमच्याकडे खूप योद्धे आहेत. आम्हाला कुठलीच काळजी नाही. आम्ही भक्कम आहोत. जॉर्डन आणि लेबेनॉनमधील लोक आमच्यासोबत आहेत. या हल्ल्यामुळे इस्राइलची प्रतिमा मलिन झाली आहे. आम्ही इस्राइलची सुरक्षा व्यवस्था भेदण्यात यश मिळवलं आहे. इस्राइलची सुपर पॉवर ही प्रतिमा आम्ही उद्ध्वस्त केली आहे. आम्ही इस्राइलच्या गुप्तचर खात्याला अपयशी ठरवलं आहे.

दरम्यान, इस्राइल आणि हमास युद्धामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा सातत्याने वाढत आहे. गाझापट्टीमध्ये हमासच्या अड्ड्यांवर इस्राइलकडून बॉम्बफेक सुरू आहे. तसेच हा हल्ला पुढच्या पातळीवर नेण्याची इस्राइलकडून तयारी सुरू आहे. इस्राइल आणि हमासच्या संघर्षामध्ये आतापर्यंत ४ हजार लोकांचा मृत्यू झाल आहे. इस्राइलकडून झालेल्या भीषण हल्ल्यामुळे गाझापट्टीमधील निवासी वस्त्या जमीनदोस्त होत आहेत. तसेच इस्राइलकडून हमासच्य दहशतवाद्यांना एकेक करून टिपले जात आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button