देश-विदेश

17 बायका, 96 मुलं! ‘या’ महाशयाला करायचा विचित्र रेकॉर्ड..


जगात कधी कुठे काय घडेल याचा नेम नाही. इथे सोशल मीडियावर एक विचित्र आणि धक्कादायक बातमी ट्रेंडिंगमध्ये आहे. जगाच्या पाठीवर एक असा व्यक्ती आहे ज्याने आतापर्यंत 17 लग्न केलं आहे.

त्याला या 17 बायकांकडून एकूण 96 मुलं आहे. पण या महाशयाचं मनं अजून भरलेलं नाही. त्याने एक विचित्र रेकॉर्ड करायचं ठरवलं आहे. त्याची इच्छा ऐकल्यास तुम्हाला धक्काच बसेल.

आपण कायम ऐकतं लहान कुटुंब सुखी कुटुंब…आज खरं तर प्रत्येकाच्या घरात एक किंवा दोन मुलं असतात. पण या महाशयाने तर हद्द केली आहे, 17 बायका आणि 96 मुलांसह हा व्यक्ती मोठ्या कुटुंबासोबत सुखी आणि आनंदात संसार करत आहेत. या कुटुंबाचा आकडा ऐकून तुम्ही नक्की हैराण व्हाल. या कुटुंबात एकूण 170 लोक राहतात. नवरा बायको आणि नातंवडांचासह हा एवढं मोठं कुटुंब आहे, मोहम्मद अल बलुशी या व्यक्तीचं.

काय रेकॉर्ड करायचा आहे?

या महाशया 96 मुलं असून त्याला आता ही संख्या 100 वर घेऊन जायची आहे. तो म्हणाला की, त्याने 10 वर्षांपूर्वी विक्रम हा रेकॉर्ड करण्याचं ठरवलं होतं. त्यासाठी त्याला अजून चार मुलं झाली पाहिजे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, या पूर्वी त्याच्या दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता त्याला अजून एक लग्न करायचं आहे त्यातून त्याला चार मुलं हवी आहेत. मोहम्मद अल बलुशी, संयुक्त अरब अमिराती (UAE) च्या दुबईत तो राहतो.

हा व्यक्ती होता जगातील सुपर डॅड

मोहम्मद अल बलुशी यांना मुलांचा हा वारसा त्यांच्या वडिलांकडून मिळाला असं दिसंतय. कारण मोहम्मद यांच्या वडिलांनी चार लग्नात 27 मुलं केली होती. वयाच्या 110 व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button