प्रत्येक बिलावर 600 यूनिट वीज मोफत मिळणार,राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी

लोकशाहीच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी 9423046406 हा नंबर आपल्या व्हाटसप ग्रुप मध्ये सामील करा,


चंदीगढ : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. आता प्रत्येक बिलावर 600 युनिटपर्यंत वीज मोफत देण्याची घोषणा भगवंत मान केली आहे.याबाबतचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. 

प्रत्येक बिलावर 600 यूनिट वीज मोफत मिळणार आहे. सरकारच्या या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी दिली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री भगवंत मान यांनी ट्विट करत दिली आहे. आम्ही जनतेला आश्वासन दिले होते की, आमचे सरकार (AAP) सत्तेत आल्यानंतर आम्ही 300 यूनिट वीज मोफत देऊ. सरकारने या निर्णयावर मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब केले आहे. आता प्रत्येक बिलावर 600 युनिटपर्यंत वीज मोफत मिळेल. आम्ही जनतेला दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करणार आहोत. त्याची सुरुवास झाली आहे, असे मुख्यमंत्री मान यांनी म्हटले आहे.

दरम्यान, याआधी दिल्लीतील मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सरकारने दिल्लीकरांना घरगुती वीज 200 युनिटपर्यंत मोफत दिली होती. आता पंजाबमध्ये सत्तेवर असलेल्या आम आदमी पक्षाने 600 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला आहे.

त्याआधी मुख्यमंत्री भगवंत मान सरकारने थेट घरपोच धान्य देण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे पंजाबमधील 1.54 कोटी लाभार्थी जनतेला गव्हाचा आटा घरपोच मिळत आहे. तसेच राज्य मंत्रिमंडळाने विविध विभागांत 26,454 पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला होता. त्याशिवाय शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई, एक आमदार एक पेन्शन योजनेलाही मंजुरी दिली होती.