ताज्या बातम्यामुंबई

मुंबई विमानतळावर खासगी विमान कोसळलं, खराब हवामानामुळे अपघात; व्हिडिओ आला समोर


मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली आहे. मुसळधार पावसामुळे येथे एक चार्टर्ड विमान धावपट्टीवरून घसरल्याचे वृत्त आहे. या विमानात 6 प्रवासी आणि 2 क्रू मेंबर होते. डिजिसीएने दिलेल्या माहितीनुसार, VSR Ventures Learjet 45 विमान VT-DBL विशाखापट्टणमहून मुंबईला उड्डाण करत मुंबई विमानतळावर धावपट्टी 27 वर लँडिंग करताना धावपट्टीवर कोसळलं.या विमानात 6 प्रवासी आणि 2 क्रू मेंबर्स होते. डीजीसीएने सांगितले की, हे चार्टर्ड विमान लँडिंग करत असताना मुसळधार पावसामुळे मुंबई विमानतळावरील दृश्यमानता ७०० मीटर होती. सध्या तरी कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button