क्राईम

viaeo : ISRO च्या शास्त्रज्ञांवर दिवसाढवळ्या हल्ला


इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनच्या (ISRO) शास्त्रज्ञाला बंगळुरूमध्ये एका मद्यधुंद तरुणाचा सामना करावा लागला. हा शास्त्रज्ञ आपल्या कारमधून कार्यालयाकडे जात असताना एका तरुणाने त्यांच्यावर हल्ला केला.

 

आशिष लांबा नावाच्या या शास्त्रज्ञाने सांगितले की, ते इस्रो कार्यालयात जात असताना एक व्यक्ती स्कूटर चालवत अचानक त्यांच्या कारसमोर आली, आशिषने ब्रेक लावल्यानंतर त्या व्यक्तीने त्याची स्कूटर त्यांच्या कारसमोर थांबवली आणि शिवीगाळ सुरू केली.

त्यानंतर तो व्यक्ती आशिष यांच्या कारजवळ आला आणि रागाच्या भरात त्याच्या टायरला लाथ आणि काचांवर लाथा मारल्या. ही घटना बेंगळुरूमधील ओल्ड एअरपोर्ट रोड येथे घडली.

घटना कॅमेऱ्यात कैद

ही संपूर्ण घटना कारच्या डॅशबोर्ड कॅमेऱ्यात कैद झाली आहे. आशिष लांबा यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर व्हिडिओ शेअर करून मंगळवारी (२९ ऑगस्ट) ही घटना घडल्याचे सांगितले.

त्यांनी सोशल मीडियावर या घटनेचे वर्णन करताना सांगितले की “काल इस्रो कार्यालयात जात असताना, नवीन बांधलेल्या एचएएल अंडरपासजवळ, स्कूटीवर एक व्यक्ती विना हेल्मेट बेदरकारपणे गाडी चालवत होती आणि अचानक आमच्या कारसमोर आली आणि त्यामुळे आम्हाला अचानक ब्रेक लावावा लागला.”
इस्रोचे शास्त्रज्ञ आशिष लांबा पुढे म्हणाले की, “तो आमच्या कारजवळ आला आणि भांडू लागला. त्याने माझ्या कारला दोन वेळा लाथ मारली आणि पळून गेला.”

पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत दोषीवर आवश्यक ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.

बेंगळुरू शहर पोलिसांनी त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर कमेन्ट करताना सांगितले की, या घटनेची नोंद घेण्यात आली आहे आणि संबंधित पोलिस अधिकाऱ्याला घटनेची माहिती देण्यात आली आहे.

इस्रोच्या शास्त्रज्ञाला सामोरे जावे लागलेल्या घटनेवर सोशल मीडिया यूजर्सही प्रतिक्रिया देत आहेत. दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी होत आहे.
आणखी एका शास्त्रज्ञाच्या गाडीची तोडफोड

बेंगळुरूमध्ये घडलेल्या अशाच एका घटनेत आणखी एका शास्त्रज्ञाला हल्ल्याचा सामना करावा लागला. आशुतोष सिंग असे या शास्त्रज्ञाचे नाव असून ते सेंटर फॉर नॅनो आणि सॉफ्ट मॅटर सायन्सेसमध्ये वैज्ञानिक म्हणून कार्यरत आहेत.

बंगळुरूमधील रौथनहल्ली मेन रोडवर स्थानिक गुंडांनी त्यांचा पाठलाग केला, मात्र ते थोडक्यात बचावले, असे त्यांनी सांगितले.

सुमारे चार गुंडांंनी त्यांची कार थांबविण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी कार न थांबवल्याने त्यांनी तलवारी हातात घेऊन त्यांचा पाठलाग केला. तसेच त्यांच्या गाडीची तोडफोड केली.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button