क्राईम

फ्लॅट खरेदीसाठी माहेरहून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ


पुणे : नवीन फ्लॅट घेण्यासाठी माहेरवरून पाच लाख रुपये आण, असा तगादा लाऊन विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ सासरची मंडळी करित असल्याची तक्रार पीडित महिलेने दिली आहे.

त्यावरून कोंढवा पोलिसांनी (Pune Police) पतीसह पाच जणांविरुद्ध गुन्हे (FIR) दाखल केले आहेत. हा प्रकार 7 डिसेंबर 2020 ते जुलै 2022 या कालावधीत कोंढवा येथील कौसरबाग आणि विमाननगर येथे घडला आहे.

याबाबत पीडित महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी पती शोएब अशफाक शेख (वय-25), सासरे अशफाक दादामिया शेख (वय-55) सासू शिरीन अशफाक शेख (वय-44), दीर अरबाज अशफाक शेख (वय-22) आणि अल्पवयीन नंणंद (सर्व रा. कौसरबाग, कोंढवा) यांच्या विरुद्ध आयपीसी 377, 498(A), 323, 504, 506, 354(A), 406, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात सासरे अशफाक शेख यांना अटक (Arrest) झाली होती. सध्या ते जामीनावर बाहेर आले आहेत. मात्र, पोलिसांनी अद्याप मुख्य आरोपी पतीला अटक केलेली नाही.

अॅड. मिथुन चव्हाण (Adv. Mithun Chavan) यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शोएब शेख याचा पुणे कॅम्पमधील हॉटेल संपन्न चालवत असून तो खाजगी कंपनीत नोकरीला आहे. फिर्यादी महिलेचे आरोपी शोएब शेख याच्यासोबत दुसरे लग्न झाले आहे. लग्नानंतर पती आणि सासरच्या मंडळींनी फिर्यादी यांना लग्नात हुंडा दिला नाही, मानपान केला नाही असे म्हणत शारिरीक व मानसिक त्रास दिला. तसेच फ्लॅट खरेदी करण्यासाठी माहेरवरुन पाच लाख रुपये आण, असा तगादा लावला होता. माहेरवरुन पैसे आणले नाहीत तर तलाक देण्याची धमकी पतीने महिलेला दिली.

फिर्यादी महिलेने पतीकडून आणि इतरांकडून होत असलेल्या त्रासाबद्दल सासरे अशफाक शेख यांना सांगितले.
त्यावेळी त्यांनी महिलेसोबत गैरवर्तन करुन तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करुन विनयभंग (Molestation)
केला.पती आणि सासरच्या मंडळींकडून त्रास सहन होत नसल्याने महिलेने पतीसह सासरच्या मंडळींवर कोंढवा पोलीस
ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास कोंढवा पोलीस करीत आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button