क्राईम

पत्नीला हॉटेलमध्ये घेऊन गेला अन् गुंगीचं औषध देऊन तिला बेशुद्ध केलं. नंतर जे घडलं ..


राजधानी दिल्लीमधून काळजाचा थरकाप उडवणारी एक घटना (crime news) समोर आली आहे. आदर्श नगर येथील एका हॉटेलमध्ये एका पतीने त्याच्या पत्नीशी जे केलं ते ऐकून सगळेच हादरले.

सात जन्म साथ निभावण्याची शपथ दिलेल्या पत्नीसोबत अत्यंत धक्कादाय कृत्य केलं. त्याने तिला बेशुद्ध करत तिचे दोन्ही हात कापले (chopped off hands) आणि तो तेथून सरळ फरार झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी 25 ऑगस्ट रोजी हे जोडपं कानपूरहून आलं होतं आणि एका हॉटेलमध्ये थांबले होते. जेवणाच्या वेळेस पतीने पदार्थांमध्ये गुंगीचं औषध मिसळून ते पत्नीला खायला घातलं.

आरोपी पतीचा शोध सुरू

गुंगीच औषध असलेले पदार्थ पोटात गेल्याने त्याची पत्नी बेशुद्ध झाली असता त्याने तिचा हात मनगटापासून कापला. या घटनेनंतर तो फरार झाला. पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर दाखल केली असून फरार पतीचा शोध सुरू आहे. मात्र त्याने नेमकं असं का केलं, त्यामागे काय हेतू होता, हे अजूनही समजलेलं नाही. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button