क्राईम

पतीच्या पैशांवर डोळा,युवकासोबत लफडं; पत्नीने रचलं षडयंत्र अन..


मध्य प्रदेशातील विदिशा इथं हत्येचे प्रकरण उघडकीस आले आहे. याठिकाणी एका महिलेने प्रियकरासोबत मिळून पतीचा काटा काढला आहे. पतीच्या हत्येनंतर त्याचा मृतदेह जंगलात फेकण्यात आला

या कामासाठी महिलेने २ अन्य लोकांना ५० हजारांची सुपारी दिली होती. हत्येतील आरोपी एका मुलाची आई आहे. फेसबुकच्या माध्यमातून ती प्रियकराला भेटली. सध्या या प्रकरणी पोलिसांनी आरोपी महिला आणि ३ जणांना अटक केली आहे.

विदिशाच्या शमशाबाद इथं २३ फेब्रुवारीला पोलिसांना जंगलात एक मृतदेह सापडल्याची बातमी मिळाली. त्यानंतर तात्काळ पोलीस घटनास्थळी पोहचले परंतु मृतदेहाची ओळख पटवणे कठीण झाले होते. तपासानंतर हा मृतदेह अशोक नगरमध्ये राहणाऱ्या सौरभ जैन यांचा असल्याचे कळाले. त्यानंतर शमशाबाद पोलिसांनी अशोक नगर पोलिसांशी संपर्क साधत पुढील तपास केला. चौकशी करता करता पोलिसांना एक पुरावा हाती लागला. त्यानंतर सौरभची पत्नी ऋचा जैनचे अफेअर असल्याचे समोर आले.

पोलिसांचा संशय वाढला, मृत व्यक्तीच्या कुटुंबानेही ऋचावर आरोप केले. जेव्हा पोलिसांनी ऋचाला ताब्यात घेतले तेव्हा प्रियकर दिपेशबाबतही माहिती हाती लागली. पोलिसांनी या दोघांकडे चौकशी केली असता हत्येचा खुलासा झाला. दोघांनी पोलिसांसमोर हत्येचा कबुली दिली. पोलिसांच्या माहितीनुसार, ऋचानं फेसबुकच्या माध्यमातून एका युवकाशी ओळख केली होती. या ओळखीचे रुपांत प्रेमात झाले. त्यानंतर ऋचा आणि पती सौरभ यांच्या नात्यात वाद वाढू लागले. त्यांच्यातील भांडणामुळे दुरावा आला. सौरभला ऋचावर संशय आला होता. त्यामुळे ऋचाने त्याला रस्त्यातून बाजूला सारण्याचे षडयंत्र रचले.

सौरभच्या पैशांवर ऋचाची नजर होती. एकेदिवशी तिने प्रियकरसोबत मिळून सौरभच्या हत्येची ५० हजारांत सुपारी दिली. उपचाराच्या बहाण्याने तिने सौरभला भोपाळला घेऊन निघाली. रस्त्यात प्रियकर आणि सुपारी किलर्सने मिळून सौरभच्या डोक्यावर दगड मारून त्याची हत्या केली. त्यानंतर मृतदेह कोलुआच्या जंगलात फेकून दिला. आता या प्रकरणात सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button