ताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्रमुंबईराजकीय
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्रातील जनतेला लवकरच पेट्रोल डिझेलवरील कर कपात करून दिलासा देणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात बोलताना महाराष्ट्रातील जनतेला लवकरच पेट्रोल डिझेलवर दिलासा देणार असल्याची घोषणा केली.
यापूर्वी केंद्र सरकारनं पेट्रोल डिझेलवरील कर कपात करून जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न करत होता. त्यानंतर अनेक राज्यांनी पेट्रोल डिझेलवरील कर कमी केले होते. परंतु महाराष्ट्र सरकारने पेट्रोल डिझेलवरील आपले कर कमी केले नव्हते. त्यामुळे राज्यातील पेट्रोल डिझेलचे दर अधिकच होते. दरम्यान, आता महाराष्ट्रातील सरकारनं पेट्रोल डिझेलवर लवकरच कर कपात करणार असल्याची माहिती दिली. लवकरच यासंदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंदर्भातील निर्णय घेण्यात येणार असून राज्यातील जनतेला दिलासा देणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.