ताज्या बातम्या

लोकसभेला राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा आम्ही प्रचार करू, पण.”, ठाकरे गटातील नेत्याचं मोठं विधान


शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत ईशान्य मुंबईतून लोकसभा निवडणूक लढणार असल्याची चर्चां रंगली आहे. तर, पक्षाने आदेश दिल्यास निवडणूक लढू, असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे. यावर आमदार सचिन अहिर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.संजय राऊत आपले नेते आहेत. कुठेही लढले तरी स्वागतार्ह आहे, असं सचिन अहिर यांनी म्हटलं. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.



 

सचिन अहिर म्हणाले, “संजय राऊत आपले नेते आहेत. कुठेही लढले तरी स्वागतार्ह आहे. पण, अनेक कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे, मीही विधानसभा निवडणूक लढवावी. मात्र, मला विधानपरिषद आमदारांच्या जीवावर मिळाली आहे. तशाचप्रकारे लोकसभा शाबूत ठेवणं राजकीयदृष्ट्या गरजेचं आहे. मला वाटत नाही, संजय राऊत निवडणूक लढतील.”

 

“संजय राऊत राज्याचे नेते”

 

“ईशान्य मुंबईतून संजय दिना पाटील यांना जिल्हासंघटक म्हणून संजय राऊत, सुनील राऊत आणि रमेश कोरगावकर यांच्या मान्यतेनं जबाबदारी देण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलं. संजय राऊत राज्याचे नेते आहेत. एकाच मतदारसंघात अडकून राहायचं की नाही, हा त्यांचा निर्णय आहे,” असं सचिन अहिर यांनी सांगितलं.

 

 

“.तर विधानसभेला राष्ट्रवादीला त्याची परतफेड करावी लागणार”

 

“बारामती, मावळ, शिरूर आणि पुणे या चारही लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक पार पडली. लोकसभेला राष्ट्रवादीचा ताकद द्यायची असेल, तर विधानसभेला राष्ट्रवादीला त्याची परतफेड करावी लागणार. अजित पवारांबरोबर काही आमदार गेल्याने तेथील मतदारसंघावर आमच्या कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे,” अशी अपेक्षा सचिन अहिर यांनी व्यक्त केली.

 

 

 

“कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र”

 

“आपण जागा मागतोय, पण आमची खरोखरच मतदारसंघात ताकद आहे का? संभाव्य उमेदवार कोण आहे? पक्षसंघटनेची आजची स्थिती काय? याचा आढावा घेतल्यानंतर अंतिम निर्णय होईल. पण, कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत. लोकसभेला बारामती, शिरूर, पुण्यात किंवा अन्य ठिकाणी प्रचार करून. मात्र, तसाच न्याय विधानसभेला काँग्रेस, राष्ट्रवादीने आम्हाला द्यायला हवा,” असं मत सचिन अहिर यांनी व्यक्त केलं.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
  • .
Back to top button