क्राईमताज्या बातम्यामहत्वाचेमहाराष्ट्र

देवदर्शन करून येणाऱ्या अर्जुन मोहन यादव याच्यावर गोळीबार करून खून


सातारा : येथील बॉम्बे रेस्टॉरंट चौक परिसरातील नटराज मंदिराजवळ दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी देवदर्शन करून येणाऱ्या अर्जुन मोहन यादव (वय 25 वर्षे, रा.सिद्धनाथवाडी) याच्यावर गोळीबार करून त्याचा खून केला.

ही घटना शनिवारी दुपारी तीन वाजता भरदिवसा घडल्याने शहर व परिसरात एकच खळबळ उडाली होती. माहिती मिळताच सातारा शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन या घटनेचा पंचनामा केला. त्यानंतर संशयितांच्या शोधासाठी तातडीने पथके रवाना करण्यात आली. हा खून नेमका कोणत्या कारणासाठी झाला हे अद्याप समजू शकलेले नाही. याबाबत पोलीस सूत्र आणि घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, शनिवारी दुपारी तीनच्या दरम्यान मृत यादव त्याच्या ऍक्‍टिव्हा गाडीवरून नटराज मंदिरात देवदर्शनासाठी आला होता. देवदर्शन करून परत जाताना दुचाकीवरून मागून आलेल्या दोघांनी पिस्तुलातून त्याच्यावर गोळ्या झाडल्या.

संशयितांनी दोन राऊंड फायर केल्याची परिसरात चर्चा आहे. त्यातील एक गोळी यादव याच्या डोक्‍यात लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button